पोलीस भरती पुर्वप्रशिक्षणाला तीव्र विरोध÷शिवस्वराज्य युवा संघटनेचे अध्यक्ष संदिप मुटकुळे




पंढरपूर // प्रतिनिधी 

महाविकास आघाडीचे सरकाराचे मंत्री नवाब मलिक यांनी पोलीस भरतीच्या पूर्व तयारीसाठी मुस्लिम युवकांना सवलती जाहीर केल्या आहेत.फक्त मुस्लिम असलेल्यांना सरकारी खर्चाने पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे त्यांना सरकारी खर्चाने ट्रॅक,सुट,बूट,पुस्तके इत्यादीच्या खरेदीसाठी अनुदान मिळणार असून,प्रशिक्षण कालावधीसाठी दरमहा १८००/- रुपयेचा भत्ता मिळणार आहे.हे अत्यंत चुकीचे असून छत्रपती शिवाजी महाराज,शाहू महाराज,छत्रपती संभाजी महाराज,फुले,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,आण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकराच्या महाराष्ट्रातील पोलीस भरती अत्यंत चुकीच्या पद्धतीने पोलिस भरती होत आहे.स्वर्गीय आर.आर.पाटील यांच्यासारखी पोलिस भरती काढा.

पुर्वप्रशिक्षणासाठी इच्छुक असलेल्या आणि त्यासाठी अतोनात कष्ट घेणार्या बहुसंख्य युवक-युवतींवर अन्याय होणार नाही.नवाब मलिकांचा बोलविता धनी महाविकास आघाडी सरकार आहेत.यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी पोलिस भरती काही नियम अटी सवलतीमध्ये बदल करावा.आपण किती टोकाचा निर्णय घेणार आहेत.हे यावरून लक्षात येईल.नवाब मलिक यांनी केलेल्या घोषणेबद्दल आम्ही त्यांचा आणि त्यांचे बोलावते धनी महाविकास आघाडी सरकाराचा यांचा निषेध करत आहोत.पुढील आठवड्यात महाविकास आघाडी सरकाराच्या व शासनाच्या पुर्वप्रशिक्षणाच्या धोरणा विरुद्ध महाराष्ट्रात सर्व ठिकाणी संघटनेच्या  वतीने निषेध आंदोलन करण्यात येईल.पोलिस भरतीसाठी कोणताही जाती भेदभाव न करता महाराष्ट्रातील सर्व इच्छुक युवकांना पुर्वप्रशिक्षण देण्याची योजना शासनाने जाहीर करावी,फक्त मुस्लिम युवकांना प्रशिक्षण देण्याचा पक्षपाती निर्णय शासनाने घेतला तर तो समस्त बाराबलूतेदारांच्या विरोधी असेल असे आम्हाला वाटते ते आम्ही कदापि सहन करणार नाही.असे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री अनिल देशमुख,सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब पंढरपूर उपविभागीय अधिकारी साहेब सचिन ढोले यांच्याकडे मेलव्दारे मागणी करण्यात आली आहे.असे शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे म्हटले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget