पंढरपूर प्रतिनिधी:- मोहोळ तालुक्यातील सिध्देवाडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ तालुक्यातील दाजी शिंदे मित्र मंडाच्या वतीने गरीब व गरजू कुटुंबालाना जीवनावश्यक वस्तू तांदूळ, साखर, तेल ,दाळे, पोहे ,शेंगदाणे, गहू ,साबण इत्यादी वस्तुचे वाटप करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्याचे मनसे नेते प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे हे गेली तीन ते चार महिने झाले कोरोनाशी दोन हात करून लढत आहेत पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक क्षेञातील लोकांना त्यानी लाॅकडाऊन काळामध्ये आधार दिला आहे .
पंढरपूर शहर व तालुक्यातील हजारो लोकांना प्रत्येक ठिकाणी जाऊन मदत केलेले आहे आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोलापूर जिल्हात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केलेले होते.
अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर सपन्न झाले .दिलीप धोञे कुठल्या कार्यात सहभागी होऊन आपले योगदान देतात चालू परिस्थिती ते तरून पिढीचे एक आदर्श व्यक्ती महत्व बनले आहेत .मोहोळ तालुक्यातील सिध्देवाडी येथे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा ग्रामस्थांच्या वतीनी सत्कार करण्यात आला यावेळी मनसे चे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे , मोहोळ तालुका अध्यक्ष अँड. कैलास खडके, संयोजक ग्रामपंचायत सदस्य दाजी शिंदे, सरपंच मधुकर पुजारी, सुनिल माने ,माजी सरपंच महादेव मोहीते ,जगन्नाथ माने ,कालिदास माने ,इत्यादी उपस्थीत होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.