वृत्तसंस्था // प्रतिनिधी
भारताचे पहिले आँलम्पिकविर स्व. खाशाबा जाधव यांची ३६ वी पुण्यतिथीनिमित्त शिवसेनेच्या वतीने गोळेश्वर ता. कराड येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन केले.
यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव म्हणाले स्वतंत्र भारताला पहिले आँलम्पिक पदक मिळवून दिल्यामुळे कराड नगरीचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात गेले. कुस्ती या खेळाचे महत्त्व वाढले. त्यांची प्रेरणा घेऊन अनेक मल्ल महाराष्ट्र केसरी व हिंदी केसरी झाले. त्यांनी खुप प्रतिकुल परिस्थितीत भारत देशाला सर्वात पहिले आँलम्पिक पदक मिळवून दिले याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा योग्य सन्मान करावा अशी मागणी काकासाहेब जाधव यांनी यावेळी केली.
यावेळी खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रंजीत जाधव , नातू अमरदिप जाधव , शहर प्रमुख शशीराज करपे , प्रविण लोहार , पांडुरंग करपे , अनिल देशमुख उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.