सरकारने जर मंदिरे उघडे करण्याची तारीख जाहीर केली नाही तर 31 ऑगस्टला पंढरपूरला विठ्ठल मंदिराचे कुलूप तोडून मंदिराच्या आत ठिय्या आंदोलन करू



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

गेल्या सहा महिन्यापासून कोरोना संकटाचे नाव घेऊन सरकारने महाराष्ट्रातील मंदिरे बंद करून ठेवलेली आहेत आणि भजन-कीर्तन केल्यास गुन्हे दाखल करीत आहे सरकारने सध्या मॉल, चित्रपट शूटिंग, देशी दारू, इतर सर्वच जवळ जवळ सगळीकडचे व्यवहार सुरळीत चालू केलेला आहे आणि या सर्व ठिकाणी गर्दी दिसून येत आहे पण महाराष्ट्रातील देवस्थान मात्र बंद आहेत ज्याप्रमाणे रावणाने तेहतीस कोटी देव बंदी खाण्यात ठेवले होते त्याप्रमाणे सध्या सरकारने सुद्धा देव बंदिस्त करून ठेवलेले आहेत सरकारने देशी दारूची दुकाने उघडी केली अर्थात सरकारचा दारू पिणाऱ्या वर विश्वास आहे  की पीनारे अंतर ठेवून सोशल डिस्टंसिंग दारू पितील पण महाराष्ट्रातील वारकरी सोशल डिस्टंसिंग ने दर्शन घेतील हा विश्वास वारकऱ्यांवर नाही असं म्हणायला काही हरकत नाही

सरकार मंदिराला वैयक्तिक मालमत्ता समजत आहे की काय हा प्रश्न पडलेला आहे

  खरं म्हणजे देवस्थानावर व्यवस्थापक नियोजक म्हणून सेवक या नावाने सरकार आहे आणि मंदिराचे खरे मालक महाराष्ट्रातील वारकरी भगवंताचे भक्त आहे आणि म्हणून सेवकाने आपल्या पायरीने राहावे मालक होण्याचा प्रयत्न करू नये येत्या 26 ऑगस्ट पर्यंत जर सरकारने महाराष्ट्रातील देवस्थान उघडे करण्याची तारीख जाहीर केली नाही तर 31 ऑगस्टला चलो पंढरपूर नारा लावून महा क्षेत्र पंढरपूर येथे किमान एक लाख वारकरी दाखल होणार आहेत आणि सर्वात आधी आम्ही विश्व वारकरी सेनेचे पदाधिकारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कुलूप तोडून मंदिरामध्ये प्रवेश करून मंदिरामध्ये ठिय्या आंदोलन करणार आहोत

आणि म्हणून सरकारने या बाबीचा गांभीर्याने विचार करून महाराष्ट्रातील देवस्थाने नियम अटी लावून त्वरित उघडी करावी व  भजन-कीर्तन करण्याकरिता रीतसर नियम व अटी लावून परवानगी द्यावी

ही नम्र विनंती.                  ‌‌.   '

ह भ प गणेश महाराज शेटे युवा विश्व वारकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष


हभप जगन्नाथ महाराज देशमुख विश्व वारकरी सेना राष्ट्रीय युवक अध्यक्ष

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget