कॅप्टन कूल'चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, धोनीची निवृत्तीची घोषणा


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार असलेल्या एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इन्स्टाग्रामवर धोनीने एक व्हिडिओ पोस्ट करून आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. एवढे वर्ष दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आपण सगळ्यांचे धन्यवाद देतो, असं धोनी म्हणाला आहे. इन्स्टाग्रामवर शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये धोनीने 'मे पल दो पल का शायर हूं' हे गाणं ठेवलं आहे. 


२००४ साली धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. २००७ साली टी-२० वर्ल्ड कपमध्ये धोनीने पहिल्यांदाच भारताचं कर्णधारपद भूषवलं. कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सीरिजमध्ये धोनीने भारताला २००७ सालच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक विजय मिळवून दिला. यानंतर २००८ साली ऑस्ट्रेलियातही भारताने वनडे सीरिज धोनीच्याच नेतृत्वात जिंकली. 


२०११ सालीही धोनी कर्णधार असताना भारताने ५० ओव्हरचा वर्ल्ड कप जिंकला. श्रीलंकेविरुद्धच्या फायनलमध्ये धोनीने मॅच विनिंग खेळी करत भारताला २८ वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकवून दिला. यानंतर २०१२ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताचा विजय झाला तेव्हा धोनी कर्णधार होता. आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. 


धोनीने ३५० वनडेमध्ये ५०.५८ च्या सरासरीने १०,७७३ रन केले, यामध्ये १० शतकं आणि ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. तर ९८ टी-२० मॅचमध्ये धोनीने ३७.६ च्या सरासरीने १,६१७ रन केले. टी-२० क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर २ अर्धशतकं आहेत. २०१४ सालीच धोनीने टेस्ट क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतली होती. ९० टेस्ट मॅचमध्ये धोनीने ३८.०९ च्या सरासरीने ४,८७६ रन केले. यामध्ये ६ शतकं आणि ३३ अर्धशतकं होती. 


९ जूलै २०१९ ला एमएस धोनी शेवटचा मैदानात दिसला होता. वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनल मॅचनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget