साहेब तुमच्या श्रीमंतानी आज सहकारातील डॉक्टरकीच्या प्रॅक्टिसचा शेवट केला


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

जन्म आहे म्हटले की मृत्यू हा अटळ आहे,पण लाखो कुटुंबाच्या खऱ्या अर्थाने चुली पेटवणाऱ्या, कुटुंबातील चुली सुद्धा आज अश्रू ढाळत असतील,कारण मालकांचे अस जाणं नियतीने तरी कसं मान्य झाले याचाच विचार आज प्रत्येक जण करत असेल 

          आज सहकारातील मशनिरी प्रत्येकाला प्रश्न विचारत असतील कारण हा देवमाणूस बंद पडलेल्या मिशनरी आपले प्राण ओतून त्या चालू करण्यासाठी जिवाच्या आकाकांताने प्रयत्न करत होते,पण आपल्या स्वतःच्या शरीरातील मिशनरी ची काळजी कधी घेतलीच नाही,,जोपर्यंत शरीरात ऊर्जा आहे तोपर्यंत शेतकऱ्यांच्या भल्यासाठी च निर्णय घेतले ,
       एवढेच काय पण कोरोनाच्या काळात देशाची आर्थिक उलाढाल ठप्प असताना सुद्धा या बळीराजाने आपल्या शेतकऱ्यांना घामाचे दाम देत असताना ,,,जी बैलगाडी माझ्या कारखाना पर्यंत ऊस वाहतूक करतो त्या बैलपोळा चे निमित्ताने मालकांनी मोठ्या उदार मनाने 200 रुपये चा हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा ही केले,,
        मालक आपल्याला दृष्टांत च झाला होता की काय हो,,,माझ्या जाण्याने माझा शेतकरी बैलपोळा सारखा सण ही करू शकणार नाही म्हणून देव आज्ञा होण्याच्या आधीच आपण शेतकऱ्यांना जाताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर हसू देऊन गेलात
       ज्याप्रमाणे बळींन कृषी संस्कृती ची स्थापना केली,कायम स्वरुपी भोजन व रोजगाराची वैवस्था करून लोकांना स्थैर्य दिलं,जोपर्यंत बळींन राज्य केलं तोपर्यंत कोणावर ही अत्याचार होणार नाही .सर्व प्रजा सुखी होता ,कोणालाही त्रास न देता सर्वस्व गमावून एकाकांत राहिला त्याच प्रमाणे आदरणीय मालकांनी आपण जीवन शेवटच्या क्षणापर्यंत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल असेच निर्णय घेतले
     आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी कायम आदराने ज्यांना #श्रीमंत म्हणूनच हाक द्यायचे याचे कारण आज मनाला पटते की ज्यांनी शेवटच्या क्षणी सुद्धा आपल्या मनातील श्रीमंती दाखवून या जगाचा अन शेतकऱ्यांचा निरोप घेतला
         विधानसभा 2020 अनेक घडामोडी घडल्या अनेकांचे लक्ष साहेबांच्या सभेकडे होते की साहेब जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापने च्या आधीपासूनच साहेबांचे राजकीय सहकारी म्हणून सोलापूर जिल्ह्याची धुरा सांभाळली त्यांच्या विरोधात काय बोलतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते,,
        पण 1 तास 20 मिनिटाच्या आपल्या भाषणात पवार साहेबांनी मात्र श्रीमंतांच्या विरोधात एक शब्द काढला नाही,कारण श्रीमंतांची आवस्था वरून जरी वेगळी असली तरी आतून काय वेदना होत असतील याची जाणीव साहेबांना नक्कीच झाली असणार,जनतेने दिलेला कौल मान्य करू पण साहेबांचे शब्द मात्र कायम मालकांच्या स्मरणात राहिले असते कदाचित हीच भावना साहेबांची असेल राजकारणाच्या पलीकडे जपलेले नाते 10 ते 15 दिवसाच्या प्रचारामुळे संपवता येत नाही याच आज मात्र हे ऋणानुबंध सर्वांच्या लक्षात येत असतील,,,,
      बातमी समजल्यानंतर सिल्व्हर ओक वर निरोप की  दिला साहेबांना सांगा तुमच्या श्रीमंतांनी सहकारातील डॉक्टरकीच्या प्रॅक्टिसचा आज शेवट केला
     
आदरणीय श्रीमंत सुधाकरपंत परिचारक मालकांना भावपूर्ण श्रद्धांजली
परिचारक परिवारावर अन पांडुरंग परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यातून सावरण्याचे बळ त्यांना परमेश्वराने द्यावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना

शोकाकुल
श्रीकांत शिंदे
प्रदेश सचिव
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget