वृत्तसंस्था // प्रतिनिधी
कणखर नेतृत्व हाच समाजाचा आधार असतो श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांच्या रुपाने सोलापुर जिल्ह्यातील राजकीय , सहकार क्षेत्रातला आधारवड आज दुर्देवाने कोसळला त्यामुळे सोलापुर जिल्ह्याचे व विशेषत: मोहिते-पाटील परिवाराचे अपरिमित नुकसान झाले आहे.
सहकार महर्षीं सोबत राजकारणात असलेले सुधाकरपंत पुढे पुढे मोहिते-पाटील परिवाराचे घटक बनले महर्षींच्या खांद्याला खांदा लावून सोलापुर जिल्ह्यातील अनेक संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्याचा कायापलट केला .महर्षींच्या निधना नंतर वडिलकीच्या नात्याने विजयदादांच्या पाठीशी खंबिरपणे उभा राहून एक विचाराने जिल्ह्यातील राजकीय , सामाजिक , सांस्कृतीक , सहकार क्षेत्रात भरीव योगदान दिले . या क्षेत्रातील निर्णय प्रकियेत सुधाकरपंतांचा ' शब्द ' विजयदादा व इतरांना मान्यच असायचा .
श्रीमंत परिचारकांचे प्रेम , आशिर्वाद कायम स्मरणात राहील .पंतांचे जिवन व कार्य आजच्या पिढीला दिपस्तंभासारखे आहे .अशा या कर्मयोगी ,नेत्याला
मोहिते-पाटील कुटुंबियांच्या वतिने
भावपुर्ण श्रद्धांजली

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.