वडील कै. रामचंद्र बाळकृष्ण परिचारक हे ३४ वर्षे तालुका पंढरपूर खर्डी ग्रामपंचायतीचे सरपंच होते. काका दिवाणबहादुर कै. गोविंद उर्फ बाळासाहेब बाळकृष्ण परिचारक हे पंढरपूर नगर परिषदेमध्ये 11 वर्षं नगराध्यक्ष होते.
वडील व काका यांच्याकडून प्रेरणा व बाळकडू घेऊन समाजकार्य व राजकारणामध्ये सन 1958 च्या सर्वोदय संमेलनापासून सक्रिय सहभाग व शुभारंभ.
सन 1967 ते 1973 पर्यंत पंढरपूर तालुका पंचायत समिती सदस्य उपसभापती म्हणून निवड.
सन 1972 ला सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवड.
सन 1978 साली प्रथम विधानसभेला पराभूत व त्यानंतर 1981 साली कै. पांडुरंग तात्या डिंगरे माजी आमदार यांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा.
तसेच पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून 1985 पासून ते 2009 पर्यंत सलग पंचवीस वर्षे आमदार म्हणून कार्यरत 2009 स साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार स्वतःच्या विधानसभा उमेदवारीचा त्या केला 2019 साल पंढरपूर करांच्या आग्रहास्तव भारतीय जनता पार्टी कडून त्यांनी निवडणूक लढली होती परंतु त्यात त्यांना अपयश आले.
पंढरपूर तालुक्यातील पहिला सहकारी साखर कारखाना श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे आभारी नीद सक्रिय सहभाग पंढरपूर सर्वजनिक मंडळाची चेअरमन.
दि.19/6/20000 रोजी एस. टी. महामंडळाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती. सन 1993 पासून सतत तोट्यात असणारी (अंदाजे रू.700 कोटी) एस.टी. महामंडळ सन 2006-07 या. 23 कोटी नफा मिळवून आर्थिक अडचणीतून बाहेर आणले. सन 2005 मध्ये विधानसभा अस्तित्ववाद अस्तित्वात येताच पुन्हा एसटी महामंडळाचे अध्यक्षपदी नियुक्ती झाली व सन 2007-08 या आर्थिक वर्षात रु.150 कोटी नफा करून दिला.
जिल्हा नियोजन मंडळ व जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक म्हणून कार्य.
सन 1993मध्ये श्रीपुर तालुका माळशिरस येथील बृहन महाराष्ट्र शुगर फेडरेशन इंडस्ट्रीज या खासगी साखर कारखाने चे रूपांतर सहकारी कारखान्यात करून नवीन श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची त्यांनी मुहूर्तमेढ रचली व सदर कारखाना पूर्ण नफ्यात चालत असून नुकतेच या कारखान्याचे विस्तारीकरण करून वीजनिर्मितीचा सहकार क्षेत्रातील व्यक्तीला पहिला कार्बन क्रेडिट मिळविणारा मोठा प्रकल्प आहे. जिल्ह्यातील सर्वांच्या एफआरपी दर देणारा कारखाना म्हणून नाव लेखी मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखाना हा तत्कालीन संचालक मंडळाचे नियोजनामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा होता. सन 1986 साली महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय चेअरमन म्हणून त्यांची नियुक्ती केली सन 1989 पासून 2010 या कालावधीत सदर कारखान्यात ऊर्जितावस्थेत आणून प्रगतीपथावर पोचविले, या कालावधीत सदर कारखान्याकडे महाराष्ट्रातून सोलापूर जिल्ह्यातील एक लक्षवेधी प्रगतशील कारखाना म्हणून पाहिले जात होते.
पंढरपूर या तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रशासन दरबारी सातत्याने प्रयत्न करुन 'सुंदर पंढरपूर' योजना कार्यान्वीत केली.
सदर योजनेतील पहिला टप्प्याचे रू. 10 कोटीची कामे पूर्ण झाली असून पंढरपुरातील प्रदक्षिणा रोड हा संपूर्णपणे मोठा रुंद करून आषाढी व कार्तिकी यात्रेचे वेळ पंढरी नगरीत येणाऱ्या कोट्यावधी वारकऱ्यांना वाहतुकीची मोठी सुविधा उपलब्ध करून दिली.
सन 1966 ते 2002 अशी 37 वर्षे त्यांनी दि पंढरपूर अर्बन को-ऑप. बँक लि.चे संचालक पद भुषविले आहे तसेच ते सन 1975 ते 1989 अशी 14 वर्षे बँकेचे चेअरमन होते.
पंढरपुरात गणेश तरुण सेवा मंडळाची संस्था पणा करून या संस्थेमार्फत मूक-बधिर व मतिमंद विद्यालय सुरू केले व या विद्यालयात कोण सध्या 120 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शिक्षक प्रसारक मंडळाचे संस्थापना करून लहान मुलांसाठी आदर्श प्राथमिक विद्यालय सुरू केले.
तसेच पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ मार्फत महाविद्यालय संस्था भरभराटीस मोलाचे मार्गदर्शन व आर्थिक सहकार्य दिले.
भूकंप, चक्रीवादळ, सुनामी, महापूर अशा नैसर्गिक आपत्तीचे वेळी तसेच, कारगिल युद्धामध्ये वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना कुटुंबियांना व पंढरपुर तालुक्यातून व सर्व सहकारी संस्थेच्या माध्यमातून भरघोस आर्थिक मदत दिली.
सन 1966 पासून ते 2015 पर्यंत दि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पद भूषवित असून सण 1977 ते 1980 व सन 1999 ते 2006 या बँकेचे चेअरमनपद भूषवून बँकेची माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विकासात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
पंढरपूर येथे धन्वंतरी सहकारी रुग्णालयांची संस्था स्थापन करून गोरगरीब रुग्णांना अल्पदरात वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून दिली.
पंढरपूर शहरात दूरध्वनी केंद्र सुरू करून सर्व प्रकारच्या दूरध्वनी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून सर्व सुविधा मिळवून दिल्या.
सन 1993 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मुंबई चे संचालक म्हणून निवड झाली.
सण 2004 पासून विधानसभा सभापती व तालिका सदस्य म्हणून कार्यरत.
सन 2008 साली महाराष्ट्र राज्य विधानसभेतील उत्कृष्ट भाषण गौरव पुरस्काराने भारताच्या आदरणीय राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील यांचे शुभास्ते सन्मानित.
सन 2013 मध्ये सोलापूर जिल्हा नगरी बँक्स असोसिएशन तर्फे सका रत्न पुरस्कार प्रदान.
सन 2013 मध्ये सुशील माधव न्यास यांच्यातर्फे जिला जाणारा भक्ती सेवा पुरस्कार प्रदान.
स्वतः संस्थापक असलेल्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन म्हणून कार्यरत.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.