योग, प्राणायाम करा, कोरोनापासून दूर राहा!


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

आयुर्वेद हा पुराण काळापासून प्रचलित असून, आजारी पडू नये म्हणून अनेक औषधी या शास्त्राने सांगितली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या अवलंबली तर कोरोना होणार नाही. शिवाय, इतर आजारही दूरच राहतील, असा सल्ला पुणे शहरातील ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. सुहास परचुरे यांनी दिला आहे.


कोरोनाची लस जोवर येत नाही तोवर आपल्याला आपली काळजी घेणे खूप गरजेचे झाले आहे. गेल्या तीन पिढ्यांची आयुर्वेदाची परंपरा जपणारे पुणे येथील ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. सुहास परचुरे यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही सहज सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत. ही औषधी स्वस्त तर आहेतच; शिवाय ती कुठेही मिळतात. आयुर्वेद दिनचर्येला जोड म्हणून त्यांनी योग आणि प्राणायामही सांगितला आहे. त्यांनी अनुभवातून दिलेल्या या महत्त्वाच्या टिप्स...


1) योग व प्राणायाम :


नियमित योग, प्राणायाम करा यात अनुलोम विलोम, भस्त्रिकासारख्या प्राणायामाने खूपच ताजेतवाने आणि ऊर्जावान होतो. यासह योगाची कोणतीही तुम्हाला जमतील अशी सोपी मोजकी आसने करा. सकाळी किमान एक तास जर या दिनचर्येला दिला तर प्रतिकारकशक्तीम खूप वाढेल.


2) संतुलित आहार :


यात आपण घरी जे अन्न  बनवतो तेच रोज खावे. वरण, भात, भाजी, पोळी कोणतीही भाजी असा साधा आहार ठेवावा.


3) आयुर्वेदिक दिनचर्या :


आयुर्वेदिक काढे, च्यवनप्राश किंवा जेष्ठमध, अश्व,गंधा, गुळवेल, सुंठ आणि भीमसेनी कापूर यांचे मिश्रण करून दररोज अर्धा चमचा कोमट पाण्यातून घेतला तर सर्दी, कफ, खोकला व्हायरल फिव्हरपासून बचाव होण्यास मदत होईल.

4) चुर्णे घ्या :


त्रिभुवन कीर्ती, नागगुटी, नारदीय लक्समिविलास, सितोपलादी चूर्ण ही औषधे वैद्यांच्या सल्ल्याने प्राथमिक सर्दी, खोकला अवस्थेत घ्यायला हरकत नाही.


5) गरम पाणी दररोज वापरा :


दररोज गरम पाण्याने गुळण्या करणे, नाक आणि तोंडाद्वारे गरम वाफ घेणे हेदेखील सोबत केले तर आपण सर्व बाजूंनी सुरक्षित राहू शकतो. सतत हात साबणाने धुणे, मास्क लावणे हेही सतत करणे गरजेचे आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget