गौरी सजावटी मधून दिला कोरोना प्रबोधनाचा संदेश
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
श्रीपुर ता.माळशिरस येथील वैद्यराज पांडुरंग देवडकर यांच्या घरी गौरी-गणपतीला प्रत्येक वर्षी आकर्षण आणि नवीन काय याची उत्सुकता परिसरातील सर्व नागरिकांना असते. देवडकर यांच्या गौरी आणि गणपतीचे अनोखे देखावा या परिसरामध्ये प्रसिद्ध आहेत. या वर्षीचे खास आकर्षक केलेला देखावा म्हणजे सर्वत्र शाळा बंद आहेत. खऱ्या अर्थाने जी काळाची गरज आहे ऑनलाइन शिक्षण. या काळा मध्ये विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून ऑनलाइन शिक्षणावरती भर द्या. आपले शिक्षण आपल्या घरीच घ्या. अशा प्रकारचा लॅपटॉप हाता मध्ये घेऊन गौरी शिकवत आहे. अशा प्रकारचा देखावा त्यांनी इथं दाखविला आहे. समाजप्रबोधन, जनप्रबोधन करण्याच्या दृष्टीने देवडकर कुटुंबीयांनी कोरोना संबंधी प्रबोधन करणारे छोटे-छोटे देखावे गौरीच्या समोर दाखवून जनजागृती करण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. याचे परिसरांमधून कौतुक केले जात आहे आणि महिला, लहान मुले देखावा पाहण्यासाठी फिजिकल डिस्टन्स चे पालन करत येत आहेत.
आपण भाजी मंडई मध्ये गेल्यानंतर घरामध्ये भाजीपाला घेऊन येताना तो स्वच्छ धुऊन घेतला पाहिजे हा देखील देखावा त्यांनी या गौरी समोर केला आहे. त्याच बरोबर दिवस आणि रात्र पोलीस आपल्यासाठी कोरोना योद्धे म्हणून झटत आहेत. आपण घरांमधून बाहेर पडताना मास्क बांधूनच बाहेर जावे. हा संदेश त्यांनी या देखाव्या मधून दिला आहे. त्याच बरोबर गेले अनेक वर्षापासूनची परंपरा असणारी विठ्ठलाची वारी या वर्षी कोरोना रोगामुळे घरीच करावी लागली. वारकऱ्यांना व विठ्ठल भक्तांना संदेश देणारा यंदाची वारी, आपल्या घरी हा संदेश सुद्धा त्यांनी दिलेला आहे.
कोरोना काळात खरे कोरोना योद्धे डॉक्टर्स, कोविंड सेंटरमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी, पोलीस यांच्या कार्याला सलाम असा देखावा त्यांनी या ठिकाणी तयार केला आहे. कोरोनाचे प्रबोधन करणारे अनेक संदेश त्यांनी भिंती फलकांच्या माध्यमातून दाखवले आहेत. खऱ्या अर्थाने कोणताही रोग होत असेल तर तो आपली रोग प्रतिबंध शक्ती कमी झाल्यावरच होतो. त्यासाठी आपली रोग प्रतिबंधकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे गुळ वेल काढा नियमित घ्या. अशा प्रकारचा सुद्धा त्यांनी संदेश या गौरीच्या देखाव्यातून दिलेला आहे. गौरी सजावट सर्वजण करत असतात, परंतु त्या सजावटीचा आनंद आणि त्याच्या मधून समाजप्रबोधन करण्याचा खरा प्रयत्न या देवडकर कुटुंबीयांनी केला आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.