सोलापूर शहरात व जिल्ह्यात गणरायांच्या पाठोपाठ जेष्ठा गौरीचे आगमन


सोलापूर // प्रतिनिधी 


शहर आणि  जिल्ह्यात श्री गणरायांच्या पाठोपाठ  जेष्ठा गौरीचे मोठ्या भक्तीभावाने स्वागत  करण्यात आले.

मंगळवार दि.२५ रोजी दुपारी १.५८ नंतर अनुराधा नक्षत्रात जेष्ठा गौरीचे आवाहन करण्यासाठी  शुभ मुर्हुत असल्याने सुहासिनी महिलांनी घरोघरी जेष्ठा गौरीला मोठ्या  भक्ती भावाने आवाहन  केले. 

संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहर आणि  जिल्ह्यात  काही  ठिकाणी वरुणराजानी हजेरी  लावली. एकीकडे  वरुणराजा बरसत होता  तर दुसरीकडे घरोघरी  जेष्ठा गौरीचे  स्वागत करण्यासाठी  लगबग सुरु होती ..

एकंदर सोलापूर  शहर जिल्ह्यात  वरुणराजाच्या साक्षीने जेष्ठा गौरीचे आगमन झाल्याने भक्तगणातून समाधान  व्यक्त  होत  आहे .

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget