पंढरपूर // प्रतिनिधी
गेल्या 3 महिन्यांपासून गाईच्या दुधाला 30 रुपये दर द्यावा, 5 रु.प्रति लिटर अनुदान द्यावं तसेच दुध भुकटीला 50 रु.प्रति किलो अनुदान द्यावं यासाठी माजी दुग्धविकास मंत्री महादेवराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यात वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन चालू आहेत.
त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आज पंढरपुर येथे रासपच्या वतीने मुख्यमंत्री महोदय जागे व्हा शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा यासह मागण्या यात केल्या आहेत.
दुधदराचं जे आंदोलन चालू आहे त्यावर मुख्यमंत्री यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही आजपर्यंत आम्ही वेगवेगळ्या पध्दतीने प्रशासनाच्या वतीने या मागण्या त्यांच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासनामार्फत हे मुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत पोहचलं की नाही माहिती नाही म्हणून आम्ही आज राज्यातील प्रत्येक गावागावातुन तालुक्यातून ही पत्र त्यांच्या मातोश्री, कलानगर वांद्रे मुंबई या पत्त्यावर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना पाठवत आहोत असं मत रासपचे नेते पंकज देवकते यांनी यावेळी मांडले.
यावेळी अॅड.शरदचंद्र पांढरे,महाळाप्पा खांडेकर सर,प्रा.संजय लवटे,अरुण चौगुले, राहुल तरंगे हे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.