वृत्तसंस्था // प्रतिनिधी
फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्चने कंपनीच्या कामकाजाच्या ट्रेंडवर आधारीत फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित केला होता. दिनांक १० व ११ ऑगस्ट रोजी झालेल्या या ऑनलाईन कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. भाऊसाहेब रूपनर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे उपस्थीत होते. यावेळी बोलताना मा. श्री.भाऊसाहेब रूपनर यांनी म्हटले कि, शिक्षण हे प्रत्येक यशाचा कणा आहे. विद्यार्थ्यांचे ध्येय व उद्दिष्ट प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्राध्यापकांनी विविध क्षेत्रांतील ज्ञान अद्ययावत करण्याची गरज आहे.त्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी प्राध्यापक विकास प्रशिक्षण कार्यक्रम वेळोवेळी घेण्यात यावेत असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात अभियांत्रिकी कंपनी असेंट टेक्नो सोल्यूशन्स प्रा. लि. आणि प्रशिक्षण कंपनी सुविधा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी प्रा. लि. मुंबईचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री वसंत दिनकर मेस्त्री म्हणाले कि,उर्जा क्षेत्राच्या ३० वर्षाच्या कामकाजाच्या अनुभवावर आणि विविध इनहाऊस व कॉर्पोरेट प्रशिक्षण कार्यक्रमातून प्रशिक्षण देण्याच्या अनुभवावर आधारित आज प्राध्यापकांचा विकास होणे आवश्यक आहे, कारण महाविद्यालयीन प्राध्यापक ही एक महत्त्वाची व्यक्ती आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रांचे बहुमुखी ज्ञान प्राध्यापकांना प्रत्येक अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये मजबूत शैक्षणिक कौशल्य निर्माण करण्यास व उद्योगाच्या वेगाने वाढणाऱ्या विकासास आणि स्वत: च्या कामाची ओळख शिकण्यास मदत करते. ऑईल वेल ड्रिलिंग प्रक्रिया, गॅस डिहायड्रेशन सिस्टम, ऑईल फील्ड लेआऊट आणि इंटरफेस सारख्या विविध अभियांत्रिकी ऑफशोर सिस्टमवरील उत्कृष्ट शिक्षक विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व प्राध्यापक, महाविद्यालयीन व्यवस्थापनाचे त्यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, फार्मसीचे प्राचार्य डॉ संजय बैस यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रैनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा यांच्या सहकार्याने प्राध्यापक विकास प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.