सोलापूर प्रतिनिधी :-सन २०१९ च्या पावसाळ्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात भीमा नदीला आलेल्या पूर परिस्थितीमुळे माढा विधानसभा मतदारसंघातील माढा, माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील समाविष्ट गावातील ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे ,फळबागांचे व जमिनीचे नुकसान झाले होते त्यांच्यासाठी ८ कोटी ६७ लाख रुपयाचा निधी मंजूर होऊन आलेला असून त्याचे वाटप सुरू झालेले आहे. या निधीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता व आता ही रक्कम संबंधित पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एक ते दोन दिवसात जमा होणार असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिलेली आहे.
अधिक माहिती देताना आमदार बबनराव शिंदे म्हणाले की मागील वर्षीच्या २०१९ च्या पावसाळ्यात जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये माढा विधानसभा मतदारसंघातील माढा तालुक्यातील १२ गावे, पंढरपूर तालुक्यातील २५ गावे, व माळशिरस तालुक्यातील ९ गावातील भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचे पूर परिस्थितीमुळे फळबागा, चारा वैरण पीके यांचे सहीत जमिनीचे देखील अतोनात नुकसान झाले होते. संबंधित नुकसान ग्रस्त शेतकऱ्याला तातडीने शासनाने मदत करावी म्हणून पाठपुरावा केला होता. माढा विधानसभा मतदारसंघातील पुरग्रस्त गावासाठी २२ कोटी १४ लाख ६२ हजार ८०२ रुपयाची शासनाकडून मागणी केली होती, या पैकी १३ कोटी ४७ लाख १७ हजार ७११ रुपये डिसेंबर २०१९ मध्ये मंजूर होऊन आले होते व त्याचेतातडीने डिसेंबर२०१९ मध्ये संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप करण्यात आले होते.कांही पूरग्रस्त शेतकरी या अनुदाना पासून वंचित राहिले होते, त्यांचेसाठी अतिरिक्त ८ कोटी ६७ लाख ४५ हजार ०९१ रू. एवढ्या अतिरिक्त निधीची शासनाकडे मागणी केली होती. यासाठी उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांचे मोलाचे सहकार्य मिळाले व तो निधी सध्या मंजूर होऊन आलेला असून माढा विधानसभा मतदारसंघातील संमंधीत पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात येत आहे
यानुसार माढा तालुक्यातील बारा गावात १ कोटी १ लाख७१ हजार ९८५ रुपये, माळशिरस तालुक्यातील नऊ गावांमधून ८४ लाख २३ हजार ४४० रुपये तसेच पंढरपूर तालुक्यातील पूरग्रस्त २५ गावातून ६ कोटी ८१ लाख ४९ हजार ६६६ रुपयाचे संबंधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप करण्यात येत आहे .
माढा विधानसभा मतदारसंघातील माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील भीमानदी काठच्या पूरग्रस्त ४६ गावांसाठी एकूण २२ कोटी १४ लाख ६२ हजार ८०२ रुपये नुकसान भरपाई निधी शासनाकडे मागण्यात आला होता .यापैकी १३ कोटी ४७ लाख १७ हजार ७११ रुपये मागील वर्षी डिसेंबर १९ मध्ये मंजूर झाला होता व ती रक्कम तातडीने संबंधित पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा करण्यात आली होती व उर्वरित नुकसानग्रस्तांच्यासाठी सध्या ८ कोटी ६७ लाख ४५ हजार ०९१ ही रक्कम पुराच्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे असेही आमदार बबनदादा शिंदे यांनी या वेळी सांगितले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.