प्रचंड उत्साहात मनसे चे घरपोच गणेश मूर्तीचे वाटप : दिलीप (बापू) धोत्रे

 


पंढरपूर शहरात मनसे चे घरोघरी स्वागत.

पंढरपूर // प्रतिनिधी 

कोरोना महामारीचे संक्रमण वाढत चालले असताना सर्व उत्सव व सणांवर शासनाने निंर्बध घातले असून यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा अतिशय प्रिय असणाऱ्या गणेशउत्सवावर मर्यादा आल्या आहेत.असे असताना मराठी माणसाचा हा सण पुर्वीच्या जोमाने परंतु कोरोनाचे नियम पाळून साजरा व्हावा यासाठी आज सकाळी दहा वाजल्या पासून ज्या ज्या लोकांनी  आपले नाव नोंदणी केली आहे अश्या प्रत्येक ठिकाणी जाऊन मनसे चे नेते प्रदेश सरचिटणीस दिलीप बापू धोञे व तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर उप प्रमुख महेश पवार यांनी प्रत्येक नोंदणी केलेल्या लोकांना घरपोच गणेश मूर्ती चे वाटप करण्यात आले आहे. 

त्यांना प्रत्येक ठिकाणी गणेश ची पुजा करून पंढरपूर शहरातील लोकांनी आपल्या घरोघरी येणार्या  गणेश मूर्ती चे स्वागत केले आहे.

कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाराष्ट्र नव निर्मान सेनेने हे पंढरपूर शहरातील नागरिकांन साठी मोठ पाऊल उचलेल आहे .पंढरपूर शहरातील अनेक नागरिकांनी आपले नाव नोंदवण्यासाठी गर्दी केलेले पाहण्यास मिळत आहे. दिलीप धोञे यांनी शहरातील नागरिकांना  नाव नोंदणी साठी आव्हान केलेले आहे .ज्या ज्या लोकांनी आपले नाव नोंदणी केली आहे अश्या प्रत्येक शहरातील बांधवांना गणेशाची मूर्ती मिळेल .कोरोना चा पंढरपूर शहरात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कुणीही गर्दी च्या ठिकाणी जावू नका फक्त आपले नाव नोंदणी करा महाराष्ट्र नवनिर्मान सेना घरपोच गणेश मूर्ती पोच करेल असे आव्हान  मनसे चे नेते प्रदेश सरचिटणीस दिलीप बापू धोञे यांनी केले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget