वारकरी शेतकरी मुख्यमंत्री या चर्चेला उधाण आल्यामुळे काही राजकीय पक्षांनी अध्यात्मिक नाव देऊन जिल्हास्तरीय कीर्तनकारांच्या नियुक्त्या चालू केल्या

 

    गेल्या आठवड्यामध्ये विश्व वारकरी सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व वारकरी  व शेतकरी संघटना एकत्र करून भावी मुख्यमंत्री हा वारकरी शेतकरी करून दाखवू ही बातमी वृत्तपत्रां मध्ये, न्यूज चैनल वर येता बरोबर राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून महाराज मंडळींना काही राजकीय मंडळी आतापर्यंत सल्ला देत होती तुम्ही राजकारणामध्ये पडू नये आणि आता त्यांनीच आपल्या पक्षाअंतर्गत एक अध्यात्मिक मंडळी आपल्या जवळ असावी या हेतूने जिल्हा स्तरावर कीर्तनकार मंडळींची नियुक्ती करायला सुरुवात केलेली आहे

   खरं म्हणजे एवढ्या वारकरी संघटना असल्यानंतर एखाद्या कीर्तनकार महाराजांनी विशिष्ट एका पक्षामध्ये जाणे हे योग्य नाही भविष्यात सर्व राजकीय पक्ष कीर्तनकार आपल्या जवळ असावे या हेतूने आपल्या पक्षांतर्गत अध्यात्मिक नाव देत राहतील आणि कीर्तनकारांना पद  देऊन धार्मिकतेचे एक सोंग घेऊन आपली राजकीय पोळी भाजन्याचे काम करतील

    आणि म्हणून महाराष्ट्रातील निष्ठावंत कीर्तनकार महाराज यांना नम्र विनंती आहे आपण कोणत्याही वारकरी संघटनेचे पद द्या पण राजकीय विशिष्ट पक्षाचे पद घेऊन वारकरी संप्रदाय एका विशिष्ट पक्षांमध्ये सामावन्याचा प्रयत्न करू नये ही नम्र विनंती

  आणि राजकीय नेत्यांनी सुद्धा वारकऱ्यांना विशिष्ट एका पक्षाचे समजून त्यांचा आपल्या पक्षाच्या प्रचारा करिता वापर करून घेऊ नये- ह भ प अरुण महाराज बुरघाटे विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget