कोरोंनायोद्धा गणेशमुर्ती स्थापना


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 
(ता.माळशिरस) कोरोंना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
डॉक्टर व पोलीस कोरोंनायोद्धा म्हणून काम करीत आहेत. या संकल्पनेतून
कोरोंनायोद्धा स्वरूपाची इको फ्रेंडली गणेशमूर्ती साकरण्याचे काम महाळूंग
(गट नंबर 2) येथील बारा वर्षाच्या संस्कार लोणकर यांनी एखाद्या
मूर्तीकाराप्रमाणे घरातील गणपतीची मूर्ती साकारली आहे. कोरोंनायोद्धाची
गणेश मूर्ती तयार करून  कोरोनायोद्ध्यां'ची सगळी शस्त्रंही या
बाप्पांच्या हाती दिली आहेत.

गेल्या काही वर्षांपासून सर्वत्र पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर
भर दिला जातो. त्यामुळे लाखो भक्त बाप्पाच्या मूर्तीपासून ते आरास
बनवण्यापर्यंत सर्व काही इको फ्रेंडली पद्धतीने करण्यावर भर देतात. गेले
चार वर्षापासून संस्कार लोणकर पर्यावरण पूरक व प्रदूषणमुक्त गणेश मूर्ती
घरच्या घरी तयार करून गणेशोत्सव साजरा करीत असतो. यावर्षी सर्वत्र
कोरोंनाचे सावट असल्यामुळे त्याने कोरोंनायोद्धाची गणेश मूर्ती तयार
करण्याचे ठरवले.  त्यासाठी घरासमोरील बागेतील माती व रद्दी पेपरचा  एकत्र
वापर केला असून त्यापासून मूर्ती तयार केली.  मूर्ती साकारत असताना
मूर्तीच्या निम्मा भाग पोलिस व निम्मा भाग डॉक्टर असा तयार करण्यात आला.
मूर्तीला डॉक्टर व पोलिस याच्या युनिफॉर्म प्रमाणे रंगही दिला आहे.
त्यामध्ये पोलिसांच्या हातात काठी व मास्क असे दाखवले आहेत.  तसेच
डॉक्टरांच्या हातात मध्ये सानिटायझर  ची बॉटल, तपासणी करण्यासाठी
स्टेटस्कोप दाखवण्यात आला आहे. तसेच ‘घरीच राह सुरक्षित राहावा’ असा
संदेश देणारा फलक डॉक्टरांच्या हातात दिला आहे. कोरोंनाची मूर्तीबरोबर एक
हॉस्पिटल सुद्धा उभारणी केली आहे त्यामध्ये कोविंड केअर सेंटरची स्थापना
करून त्यामध्ये रुग्णांना नेआन करण्यासाठी ॲम्बुलन्स ची सोय सुद्धा त्या
ठिकाणी केली आहे.  तसेच मूर्तीच्या पाठीमागे पृथ्वी काढलेली असून
त्याच्या बाजूला कोरोना विषाणूची प्रतिकृती तयार केली आहे. त्यावर
कोरोंनाची लस कधी तयार होणार, लॉकडाऊन कधी संपणार असे अनेक संदेश देणारे
फलक तयार करून देखावा तयार करण्यात आला आहे.

पर्यावरणास हानिकारक प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेश मूर्ती न आणता अगदी काही
मिनिटात विरघळणारी व घरीच मातीपासून बनवलेल्या बाप्पाच्या मूर्तीची
स्थापना केली आहे. प्रदूषण मुक्त गणेशोत्सव हा केवळ विचार न ठेवता
प्रत्यक्ष आचरणात आनुण. मोठ्या श्रद्धेने कोरोंनायोद्धा गणेश मूर्तीची
प्रतिष्ठापना केली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget