वृत्तसंस्था // प्रतिनिधी
कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व असेल तर गावाचा चेहरा मोहरा बदलू शकतो असे मत पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशअध्यक्ष यशवंत पवार यांनी व्यक्त केले.
ते तांडोर ता.मंगळवेढा येथे पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते.
पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने तांडोर गावाला आदर्श ग्रामपंचायतीचा पुरस्कार ग्रामपंचायत कार्यालयात आज वितरित करण्यात आला.
या पुरकाराचे वितरण प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार,सचीव आशीषकुमार सुना, पश्चिम महाराष्ट्र संघटक संतोष म्हेत्रे संघटनेचे बाबा काशीद,सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पवार व जिल्हा उपाध्यक्ष व जेष्ठ पत्रकार शिवाजी केंगार यांच्या उपस्थित देण्यात आला.
यावेळी तांडोर गावचे नेते रामचंद्र मळगे, सिद्धापूर गावचे नेते दयानंद सोनगे, सरपंच संतोष सोनगे,पत्रकार शिवाजी केंगार,अहमद शेख, विलास काळे,बाळासाहेब होनमाने, तंटामुक्त अध्यक्ष सोमलिंग मळगे, सरपंच ललिता मळगे,उपसरपंच नामदेव रणदिवे
माजी उपसरपंच गंगाधर काकणकी, युवा नेते सागर खाबले,यांच्या सह तांडोर गावचे सर्व सदस्य, ग्रामस्थ उपस्थिती होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीस जेष्ठ नेते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी सरपंच उपसरपंच, व सर्व सदस्यांचा सत्कार करून पुरस्कार वितरित करण्यात आला.
यावेळी यशवंत पवार पुढे म्हणाले, ग्रामपंचायत ही मिनी मंत्रालय आहे, विकास कामे करण्यासाठी नागरिकांची साथ महत्वाची असते , गावात नागरिकांच्या अपेक्षा नुसार विकास कामे झाली तर नक्कीच गावाचा चेहरा मोहरा बदलू शकतो,
भारत महासत्ता होण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास होणे अपेक्षित असल्याचे मत पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी व्यक्त केले.
सूत्रसंचालन व आभार माजी उपसरपंच केरापा मळगे यांनी मानले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.