वसंतराव पाटील यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन

 




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

मा. मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांचे विश्वासू सहकारी, पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे माजी सदस्य तसेच मराठा महासंघाचे संस्थापक वसंतराव गो. पाटील यांचे ह्रदय विकाराचा तीव्र झटक्याने निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर अश्विनी रूग्णालय सोलापुर येथे हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्वतः त्यांची चौकशी केली असून ते स्वतः रूग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क ठेवून होते. दरम्यान त्यानंतर मागील चार दिवसापूर्वी त्यांची तब्येत पुन्हा ढासळल्यानंतर त्यांना मार्कंडेय सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज पहाटे त्यांना रुग्णालयातच पुन्हा एकदा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा विवेक, स्नुशा, दोन नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget