पंढरपूर प्रतिनिधी :- पंढरपूर येथील अमरण उपोषणा मधे फक्त एकच मागणे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे आणि ते म्हणजे नामदेव महाराज यांच्या वंशज वरील गुन्हे मागे घेण्याची
पण आमची दुसरी अतिशय महत्त्वाची मागणी भजन-कीर्तनात करिता 50 भाविकांना परवानगी देण्यात यावी ही मागणी आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे
पंढरपूर येथे कोरोणाचा वाढता प्रभाव पाहता प्रांत अधिकारी श्री ढोले साहेब यांनी विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरून महाराज बुरधाटे यांना नम्र विनंती केली की आपण जगन्नाथ महाराज देशमुख आणि गणेश महाराज शेटे यांनी रोहित दादा पवार यांच्या सोबत केलेली चर्चा मी ऐकलेली आहे आपण एकदा रोहीत दादांना पुन्हा फोन करून विचारा आणि उपोषण मागे घ्या ही नम्र विनंती आहे
त्यानंतर आम्ही रोहित दादा पवार यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी स्पष्ट सांगितले संत नामदेव महाराज यांच्या वंशजांनवर केलेले गुन्हे मागे घेणे याकरिता मी सोलापूर जिल्हाधिकारी साहेबांसोबत बोलून त्यांना विनंती केली आणि ते माझ्या अधिकारक्षेत्र पर्यंत होते पण भजन-कीर्तनाचे परवानगी हे मुख्यमंत्री साहेबांच्या अधिकाराच्या आधीन आहे आणि येत्या मंगळवारी मी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन आपला भजन कीर्तनाच्या परवानगीचा विषय मुख्यमंत्री साहेबांना सांगतो आणि माझ्या परीने परिपूर्ण प्रयत्न करतो असे आश्वासन दिल्यामुळे आणि विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष ह भ प अरुण महाराज बुरघाटे यांनी सरकारला 8 दिवसा करीता वेळ द्या व प्रांत अधिकारी ढोले साहेब व पंढरपूर शहर पोलीस अधीक्षक पवार साहेब यांनी आमरण उपोषणाला खरोखरच भरपूर सहकार्य केल्यामुळे त्यांच्या शब्दास मान देऊन उपोषण मागे घ्या सांगण्यात आल्यामुळे तुर्त उपोषण मागे घेतले आहे
पण येत्या बुधवार पर्यंत मुख्यमंत्री साहेबांनी भजन किर्तनाला पन्नास भाविकांना परवानगी लेखी स्वरूपात दिली नाही तर महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा अपेक्षा भंग केल्यामुळे मी गणेश महाराज शेटे व विश्व वारकरी सेनेचे पदाधिकारी आणि आमच्या सोबत येणाऱ्या महाराष्ट्रातील इतर वारकरी संघटना अकोला जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसणार आहोत व महाराष्ट्र भरातून सर्व वारकरी संघटना आपापल्या जिल्ह्यातून दिंडी सोहळा घेऊन चलो अकोला चा नारा लावून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाच्या सोबत भजनी आंदोलन करणार आहोत
हे ऊपोषन दि ५ तारखेला अयोध्या येथे श्री राम प्रभू यांच्या मंदिराचे भूमिपूजन सोहळा असल्यामुळे आणि भूमिपूजन अर्थात दिनांक पाच तारीख भारत देशामध्ये आम्ही वारकरी दिवाळीचा दिवस साजरा करणार आहो हा आनंदाचा क्षण झाल्यानंतर लगेच आमरण उपोषण करणार
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील
विश्व वारकरी सेना भारत

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.