श्रीपुरच्या राख्या सीमेवरील सैनिक व पोलिसांकडे पोस्टामधून रवाना . श्रीपुर कोविड सेंटर मध्ये देखील पाठवल्या राख्या




पंढरपुर प्रतिनीधी:- माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठानच्या महिला सदस्यांनी व परिसरातील महिला भगिनींनी देशाच्या सीमेवरती रक्षण करीत असलेल्या सैनिकांना, पोलिसांना, जवानांना व कोविड सेंटर मध्ये दिवस-रात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांना श्रीपुर पोस्टमधून राख्या पाठवल्या. गेली अनेक वर्षापासून शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान सैनिकांसाठी पोलिसांसाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे. देश रक्षण करत असताना  या पोलिसांना सैनिकांना कुटुंबांमध्ये एकत्रित सण साजरे करता येत नाहीत  म्हणून प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुरेखा जाधव, उपाध्यक्षा सविता नाईकनवरे, सचिव सारिका नाईकनवरे, सदस्य विजया नाईकनवरे, करुणा धाइंजे, कांचन देवडकर, सारिका मोहिते, रंजना अडसूळ या महिला भगिनींनी राख्या एकत्रित करून श्रीपुर पोस्टा मधून नवी दिल्ली, गडचिरोली, हरियाना, तळेगाव पुणे, भोपाळ, श्रीपूर कोविड सेंटर, अकलूज पोलीस स्टेशन  या ठिकाणी पाठविल्या. सीमेवरील जवान, पोलीस आपल्या जीवाची बाजी लावून देश संरक्षण करीत असतात. 
तर  कोविंड सेंटर मध्ये डॉक्टर व सर्वच कर्मचारी जीवाची पर्वा न करता रुग्णांवर उपचार करत आहेत, रुग्णसेवा देत आहेत हे सर्वजण कर्तव्य बजावताना अनेक सण,वार, उत्सव यांच्या पासून वंचित राहत असतात. त्यांना सेवेच्या ठिकाणी राखी पौर्णिमा साजरी करता यावी म्हणून प्रतिष्ठानच्या वतीने राख्या पाठवण्यात आल्या आहेत . त्यामध्ये एक शुभेच्छा पत्र देखील पाठवले आहे आणि बहिण-भावाचे नाते अधिक घट्ट करण्याच्या दृष्टीने समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. श्रीपुर पोस्टाने राख्या पाठविण्यासाठी वेगळी स्वतंत्र यंत्रणा उभा केलेली आहे. सुट्टीचे दिवस असतानासुद्धा राख्या कशा लवकर जातील याचे देखील येथील पोस्टमास्तर अंबादास पालेमूळ, बॊगे  मास्तर, पी. जी दीक्षित, पांडुरंग भालेराव, ज्ञानेश्वर सावंत, संजय फुलबडवे, पोस्टमन बापू कचरे, विठ्ठल सुरवसे, शंकर रेडे, कृष्णा भाग्यवंत या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यवस्था केली आहे. राख्या पाठविण्याची पोस्टा मध्ये चांगल्या प्रकारे सोय केल्यामुळे महिला भगिनी मधून त्यांचे कौतुक केले जात आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget