राज्यात मुसळधार पावसाचा इशारा? हवामान खात्याचा अंदाज



 
वृत्तसंस्था प्रतिनिधी:-मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने वादळाचं रुप धारण केलं आहे. दोन दिवसापासून सतत पावसाची जोर कायम आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात पाणी साचलं आहे. मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये रस्ते आणि गाड्या पाण्याखाली गेल्या आहे. अनेक रेल्वे स्थानकांत पाणी साचलं आहे. या दोन दिवसाच्या पावसाने तब्बल 46 वर्षांचा विक्रम मोडला आहे. प्रत्येक एक किलोमीटर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

मुंबईसह , ठाणे, पालघर , रायगड  जिल्ह्यांत आणि महाराष्ट्रातील घाट भागात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच हवामान विभागाकडून रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे.

कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसामुळे वाहतुक ठप्प झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे मंत्रकाय, चर्चगेट, मुंबई विद्यापीठ आणि न्यायालयाचा परिसर जलमय झाला होता. अनेक झाड उन्मळून पडली आहेत. अशात मध्य रात्रीपासून पावसाचा जोर जरा कमी झाला असला तरी आजही मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आजही हवामान खात्याकडून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती दिली आहे. अजूनही पुढचे काही तास अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि परिसरातील नागरिकांनी घरातच राहावे. सुरक्षित राहावे, असं आवाहन पोलीस आयुक्त, प्रशासन आणि मंत्र्यांनी केलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मुंबईतल्या पावसाच्या परिस्थितीविषयी बुधवारी चर्चा केली. केंद्राकडून शक्य असेल ती सर्व मदत दिली जाईल

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget