भीमा खोर्‍यातील धरणं झपाट्याने भरू लागली, नीरा खोर्‍यात पावसाचा जोर कायम


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

भीमा खोर्‍यात होत असलेल्या पावसामुळे तेथील धरणं झपाट्याने भरू लागली असून मुळा मुठा साखळी प्रकल्प वेगाने वधारत आहे. खडकवासला शंभर टक्के भरले असल्याने यातून 13 हजार 981 क्युसेकचा विसर्ग सोडला जात असून याचा फायदा उजनीला होत आहे. हे धरण 37.16% भरले आहे.


मागील चोवीस तासात टेमघर प्रकल्पावर 133 मि.मी. पर्जन्याची नोंद आहे.शनिवारी सकाळपर्यंत मुळशी प्रकल्पावर 99, वरसगाव 64, पानशेत 68, खडकवासला 24 तर पवना 69, कासारसाई 40, वडीवळे 40 मि.मी. यासह अन्य सर्वच प्रकल्पांवर मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस नोंदला गेला आहे. या पावसामुळे मुळा मुठा खोर्‍यातील धरण भरत आहेत.


यात वरसगाव 56.91 टक्के, टेमघर 72.17, पानशेत 85.68 टक्के भरले आहे. याच बरोबर मुळशी 84 टक्के, कासारसाई 97, कळमोडी 100, आंध्रा 97 ,वडीवळे 86, भामा आसखेडा 64, चासकमान 51 तर पवना धरण 62 टक्के भरले आहे. घोड उपखोर्‍यातील धरणांवर पावसाने हजेरी लावल्याने तेथील प्रकल्प ही भरू लागले आहेत. डिंभे 62, वडज 74, घोड 51 टक्के भरले आहे.


दरम्यान भीमा खोर्‍यातील खडकवासला धरणातून 13 हजार 981 क्युसेक पाणी सोडले जात आहे. याच बरोबर अन्य धरणांचे विसर्ग कलमोडी 561, कलमोडी 1113 तर कासारसाई 800 क्युसेक.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget