रिडींगनुसार वीज बिले द्या,दुप्पट तिप्पट दिलेली वीज बिले तात्काळ रद्द करा:- अन्यथा शिवस्वराज्य युवा संघटनचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे


पंढरपूर // प्रतिनिधी 
संपूर्ण जगभरात कोरोना विषाणून संसर्गजन्यंचा प्रादुर्भावामुळे केंद्र व राज्य सरकारने लाॅकडाऊनचा उपाय योजना करुन जीवघेण्या विषाणून संसर्गजन्य वाढू नये.म्हणून तात्काळ अनेक छोटे मोठे उद्योग व्यवसाय, दळणवळण बंद ठेवण्यात आले आहे.यावर उपाय योजना म्हणून सरकारने नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध केला होता.त्यामुळे नागरीक घरातच राहून या कोरोना विषाणून बरोबर लढा दिला आहे.कालांतराने लाॅकडाऊन बाबातचे काही अटी,नियम शिथीलझाल्या नंतर थोड्याफार प्रमाणात छोटे मोठा व्यापार व्यवसाय सुरू झाले आहेत.अशी परिस्थितीतून नागरिक मार्गक्रमण करीत असताना, वीज विद्युत मंडळाकडून या लाॅकडाऊनाच्या कालावधीतील घरगुती व व्यावसायिकांना अंदाजे एकच बील देण्यात आली आहेत. त्यामध्ये वीज वापरापेक्षा दुप्पट तिप्पट वीज बिलाची आकारणी करून नागरिकांना व व्यावसायिकांना विज बिल देण्यात आली आहे.वास्तविक पाहता छोटे मोठे उद्योग व्यवसाय बंद असताना एकीकडे कोरोनामुळे अनेक कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे वीज ग्राहकांना सरासरी बिलाची आकारणी करून बिले दिली जात आहेत.तसेच विहित कालावधीत बिल न भरल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे सांगितले गेले आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये केंद्र व राज्य सरकार महाराष्ट्र शासनाच्या विरोधात असंतोष निर्माण झालेला आहे.तरी ग्राहकांनी वापरलेल्या वीजेचेच बील रिडींग प्रमाणेच यावे.अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मेलव्दारे केली व जिल्ह्यातील संबंधित वीज विद्युत मंडळाकडे प्रती पाठवल्या आहेत.महाराष्ट्र वीज विद्युत महावितरण मंडळाच्या विरोधात शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य वीज ग्राहकांना बरोबर घेवून जन आंदोलन करेल.पुढील होणा-या नुकसानीस संबंधित अधिकारी जबाबदार राहतील यांची नोंद घ्यावी असा इशारा शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी दिला.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget