सुशांत राजपूत आत्महत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येचा तपास अखेर सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. बिहार सरकारची मागणी मान्य करण्यात आली असून यापुढे या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे. 

केंद्र सरकारचे वकील तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, बिहार सरकारची मागणी मान्य करण्यात आली असून ही केस सीबीआयकडे वर्ग करण्यात आली आहे. तर रियाचे वकील श्याम दिवान यांनी सांगितले की, मेहता यांनी जे काही सांगितले तो या सुनावणीचा विषय नाहीय. न्यायालयाने याचिकेवर लक्ष घालावे. रियाने या सर्व चौकशी प्रकरणावर स्थगिती आणण्याची मागणी केली आहे. बिहारमध्ये नोंदवलेला एफआयआर हा कायद्यानुसार नाहीय. यामुळे न्यायालयाने हे रोखावे, अशी मागणी दिवान यांनी केली आहे. 

बिहार पोलीस मुंबईला गेले आणि स्वत: चौकशी करायला लागले. त्यांच्या अधिकार क्षेत्रात ही बाब येत नाही. मुंबई पोलीस आधीपासून चौकशी करत आहेत. रियाविरोधात पाटण्यामध्ये दाखल झालेला गुन्हा मुंबईला हलवावा. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 59 जणांचे जबाब नोंदविले आहेत, असे दिवान यांनी सांगितले. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget