पंढरपूर मनसेचे राज ठाकरे यांच्याकडून कौतुक



घरो घरी वाटप  केल्या दिलीप बापू धोत्रे यांनी गणेशमूर्ती

पंढरपूर // प्रतिनिधी 

कोरोनाच्या संकटकाळात मनसेची पंढरपूर व परिसरातील गरजूंना धान्य व जीवनावश्यक  वस्तूंचे गेले अनेक दिवस वितरण केले तर आता गणेशउत्सवात  मागणी करेल त्या गणेश भक्ताला घरात प्रतिष्ठापना करण्यासाठी श्री गणेशमूर्ती मोफत देण्याचा उपक्रम राबविला व यास चांगला प्रतिसाद मिळाला.

9 हजार 368 घरांमध्ये कार्यकर्त्यांनी जाऊन या मूर्ती पोहोच केल्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप (बापु) धोत्रे यांनी कोरोना च्या काळात लॉकडाऊना पुकारल्यावर शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी जाऊन गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले होते.

आता गणेश उत्सवात मोफत गणेश मुर्ती देण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला.

गणेश मूर्ती खरेदीसाठी बाजारात नागरिकांनी होणारी गर्दी कमी करण्यासाठी मनसेने ही योजना आखली होती, या आवाहनाला गणेश भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दोन दिवसात 100 कार्यकर्त्यांनी शहरातील घरोघरी जाऊन 9 हजार 368 भक्तांना गणेश मूर्तीचे मोफत वितरण केले. यासाठी कार्यकर्त्यांची 10 गट तयार करण्यात आले होते त्यानुसार शहरातील प्रत्येक भागात फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून कार्यकर्त्यांनी मूर्तीचे वितरण केले. या मूर्ती पर्यावरण पूर्वक असून त्या शाडु माती व नैसर्गिक रंगाचा वापर करून तयार करण्यात आल्या आहेत.

उस्मानाबाद, पुणे, सोलापूर या ठिकाणाहून गणेश मूर्ती आणण्यात आल्या आहेत. येथील मनसे कार्यकर्त्यांनी राबवलेल्या मोफत गणेशमूर्ती उपक्रमाचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक करत सर्व गणेश भक्तांना व कार्यकर्त्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस दिलीप (बापु) धोत्रे यांनी दिली.

यावेळी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, शहराध्यक्ष सिद्धेश्वर गरड, सागर घोडके, महेश पवार, नागेश इंगोले, प्रताप भोसले, अभिजीत डुबल, अवधूत गडकरी,  कुणाल पवार, पूजा माळी, रोहन पंढरपूरकर उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget