पंढरपूर // प्रतिनिधी
कोल्हापूर विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य भोसे (ता. पंढरपूर) येथील डॉ. अनंतराव रामराव पाटील (वय ७७) यांचे आज निधन झाले.
भोसे परिसरात त्यांना 'मिरजेची दादा' या नावाने ओळखत असत त्यांनी मिरज, कोल्हापूर व उस्मानाबाद येथे नोकरी केली. निवृत्तीनंतर चा पूर्णवेळ त्यांनी शेती विकसित करण्यासाठी दिला होता. त्यांच्यावर पंढरपूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आली त्यांच्या पश्चात पत्नी एक विवाहित मुलगा असा परिवार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची जिल्हा कार्याध्यक्ष राजू बापू पाटील यांचे ते चुलते, भोसले सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील व निवृत्त मंडळ कृषी अधिकारी शहाजी पाटील यांचे ते मोठे बंधू होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.