भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी NIAचा आरोपी प्रोफेसरच्या घरावर छापा


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 
पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन करून भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराला खतपाणी घालणारी भाषणं केल्याप्रकरणी गेल्या आठवड्यात एका प्रोफेसरला अटक करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणंनं (NIA)ही कारवाई केली होती. हनी बाबू मुसलियारविट्टील असं या प्राध्यापकाचं नाव असून तो दिल्ली विद्यापीठात इंग्रजीचा प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे.

NIA च्या अधिकाऱ्यांनी आता आरोपी हनी बाबू याच्या नोएडा येथील घरावर छापा टाकला आहे. हनि बाबू याच्या घरातून कॉम्प्युचरची हार्ड-डिस्क, पेन ड्राईव्ह आणि कुछ लिट्रेचर अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपी हनी बाबू याच्यावर नक्षलवादाचा प्रचार करणे. तसेच त्यांना फंडिंग केल्याचा आरोप आहे. NIA चे अधिकारी सध्या हनी बाबू याची कसून चौकशी करत आहे.

हनी बाबू मुसलियारविट्टील यांच्यावर नक्षली कारवायांना हातभार लावल्याचा आरोप आहे. भीमा कोरेगांव प्रकरणी कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) त्यांची चौकशी करून नंतर अटक केली आहे. देशात बंदी घातलेल्या CPI (माओवादी) या संघटनेचे ते पदाधिकारी असल्याची माहिती समजते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget