संसद भवनातील 25 खासदारांसह प्रताप पाटील चिखलीकर व प्रथम जाधव यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण.



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभीच दोन्ही सभागृहांचे किमान पंचवीस खासदार कोरोनाग्रस्त झाल्याचे आज दुपारी अधिकृतरीत्या सांगण्यात आहे. ही संख्या 50 पर्यंत वाढण्याची दाट शक्‍यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्रातील बुलडाण्याचे खासदार प्रताप जाधव आणि नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे दोघेही पाॅझिटिव्ह आल्याचे एनएनआयच्या वृत्तात म्हटले आहे.



प्रताप पाटील चिखलीकर यांना या आधीच कोरोना होऊन गेला आहे. उपचारानंतर योग्य ती दक्षता घेऊन पुन्हा कामास लागले आहेत. त्यांना पुन्हा कोरोना झाल्याचे एएनआयच्या वृत्तानुसार स्पष्ट झाले आहे. खुद्द चिखलीकर यांच्याशी संपर्क साधला असता आपली काल टेस्ट झाली आहे.



मात्र तिचा रिपोर्ट आपल्याला अद्याप कळविण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले. कोरोना दुसऱ्यांदा होत नाही, असे समजले जाते. त्यामुळे चिखलीकरांचे नाव पाॅझिटिव्हच्या यादीत कसे आले, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.


कोरोनाग्रस्त आढळेल्यांत लोकसभेचे 17 व राज्ययसभेचे किमान 6 ते 8 खासदार असल्याचे समजते. यात महाराष्ट्रातील प्रतापराव पाटील चिखलीकर व प्रतापराव जाधव यांचा समावेश आहे. गेल्या शुक्रवारपासून (ता.11) तीन दिवस खासदारांसह संसद भवन परिवसार असणाऱ्या कोवीड-19 आरटी पीसीआर चाचण्या करण्यात आल्या होत्या.

कोरोनाग्रस्त आढळलेल्यामध्ये लोकसभा उपाध्यक्षांच्या पॅनलमधील मीनाक्षी लेखी, माजी मंत्री सत्यपालसिंह तसेच वरिष्ठ नेते सुखबीरसिंग यांचा समावेश आहे.


कोरोना महामारीचा उद्रेक देशात सुरू असतानाच सलगपणे बोलावलेल्या या 16 दिवसांच्या (18बैठका) अधिवेशनात संसद परिसरात प्रवेश करण्यासाठी कोरोना चाचणी अत्यावश्‍यक आहे. संसद भवनाच्या परिसरात 40 ठिकाणी टचलेस सॅनिटायजर यंत्रे लावण्यात आली आहेत. आपत्कालीन वैद्यकीय पथके, रूग्णवाहिका आदी सज्ज ठेवण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री, खासदार, थेट सभागृहांशी संबंध येणारे सचिवालय कर्मचारी, सुरक्षा रक्षक, पत्रकार, कॅमेरामन आदींना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. आयसीएमआरकडून मोबाईलवर आलेला कोरोना निगेटिव्ह अहवाल दाखविल्याशिवाय संसद परिसरातही जाता येणार नाही. लोकसभा, राज्यसभा व प्रेक्षक गॅलऱ्यांमध्येही खासदारांची बसण्याची व्यवस्था असली तरी खासदारांच्या सहाय्यकांना परिसरातही प्रवेश मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. मागील आठवड्यात खासदार व मंत्र्यांच्या तब्बल 60 हून जास्त सहाय्यकांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते.


दरम्यान काल (रविवारी) झालेल्या चाचणीत लोकसभा व राज्यसभेचे सुमारे 25 खासदार कोरोनाग्रस्त असल्याचे आढळले. पॉझिटिव्ह आलेले भाजपचे डॉ. सुकान्त मजुमदार यांनी काल केलेल्या ट्विटमध्ये तर संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी व राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाळ, बंगाल भाजपाध्यक्ष दिलीप घोष यांचीही नावे होती. मात्र यातील दोन्ही मंत्री आज लोकसभेत हजर असल्याने त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget