शासकीय रूग्णालयात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार


सोलापूर // प्रतिनिधी 

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या साहित्य खरेदीत मोठी गडबड आहे. त्याचबरोबर सेस फंडातून खरेदी केलेली औषधे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या ताब्यात देण्यात आली व सिव्हिलमध्ये यातील रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करण्यात येत आहे, असा आरोप जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी सोमवारी केला.


कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे, या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद पदाधिकाºयांनी आरोग्य विभागाच्या सर्व साहित्य व औषध खरेदीला कोणताही आक्षेप न घेता मंजुरी दिली. त्यामुळे प्रशासनाने याचा फायदा घेत अव्वाच्या सव्वा दराने साहित्य खरेदी केल्याचे दिसून येत आहे. सॅनिटायझर, आॅक्सिमीटर, थर्मल गन यांच्या किमती बाजारापेक्षा जास्त लावण्यात आल्या आहेत. अँटिजेन किटची महापालिका, शल्यचिकित्सक यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. रुग्णांसाठी नेबुलायझर खरेदी केले, ते कुठे आहेत व त्याचा वापर सुरू आहे काय, याचा शोध घेतला जात आहे. साहित्य व औषध खरेदीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसू येत असून, यासंबंधी दोषी असलेल्या सर्व अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे मागणी करणार असल्याचे डोंगरे यांनी स्पष्ट केले.


जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून औषध खरेदीसाठी १ कोटी दिले. तसेच जिल्हा नियोजनमधून निधी दिला. बाजारात रेमडेसिविर इंजेक्शन पन्नास हजाराला असताना पंचाहत्तर हजाराने खरेदी झाली आहे. याशिवाय हे इंजेक्शन कोणासाठी वापरले याचा हिशोब सांगितला जात नाही. हे इंजेक्शन काळ्याबाजाराने खासगी रुग्णालयात अ‍ॅडमिट असलेल्या रुग्णांना पुरविले याची धक्कादायक माहिती माझ्याकडे आहे, असे डोंगरे यांनी सांगितले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget