{दिलीप (बापू) धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार मोर्चा}
सोलापूर // प्रतिनिधी
गेली सहा ते सात महिने झाले संपूर्ण भारत देशामध्ये तसेच सर्व महाराष्ट्रामध्ये कोरोनाव्हायरसने थैमान घातले आहे. या महामारी मुळे सर्व महिला बचत गटांचे सध्या उद्योग व्यवसाय बंद आहेत. या सर्व या महिला बचत गटांनी मायक्रो फायनान्स कंपनी कडून जी कर्जे घेतली होती; व त्या कर्जातून जो आपला उद्योग व्यवसाय सुरू केला होता.
तो संपूर्णपणे लाॅक डाऊन मुळे ठप्प झाला होता. ज्या काही गृहपयोगी वस्तू तयार केल्या होत्या; त्याची पण सद्यस्थितीला नासधूस झाली आहे. व तो संपूर्ण माळ खराब झाला आहे; त्यामुळे ज्या महिला बचत गटांनी मायक्रोफायनान्सचे कर्ज घेतले होते. त्या सर्व मायक्रो फायनान्स अधिकारी महिला वर्गाला त्रास देत आहेत व हप्त्यासाठी तगादा लावत आहेत. व सर्व महिला व माता-भगिनींना अरेरावीची भाषा करत आहेत या सर्व मायक्रो फायनान्स चे कर्ज माफ होण्याकरिता व या सर्व मायक्रोफायनान्स बंद होण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप (बापू) धोत्रे गेली दोन ते तीन महिने झाले सातत्याने प्रयत्न करीत आहेत. यातून मागील १५ ते २० दिवसापूर्वी एका पंढरपुरातील गृहिणीने स्वतः आत्महत्या सुद्धा केली आहे हे सर्व व असतानासुद्धा काही मायक्रो फायनान्स कंपनीचे अधिकारी महिलावर्गाला खूप त्रास देत असल्या कारणामुळे या मायक्रो फायनान्स चे कर्ज माफ होण्याकरिता मंगळवार दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक दहा वाजता पंढरपूर येथील शिवाजी चौकातून तहसील कार्यालयावर बचत गटातील महिलांचा भव्य मोर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप (बापू) धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला आहे. तरी या भव्य अशा मोर्चा सर्व बचत गटातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत आप्पा पाटील यांनी केले आहे.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.