बचतगट महिलाचे संपूर्ण कर्ज माफीसाठी पंढरपूर येथे मनसे चा 29 तारखेला मोर्चा ,,मोर्चात सामील व्हा




मनसेचे दिलीप धोत्रे यांचे सर्व महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन 


पंढरपूर // प्रतिनिधी 

कोरोनाच्या या महामारीत बचतगट हप्ते भरणे आता अश्यक्य झाले आहे. त्यामुळे हे कर्ज माफ करून मिळावे या मागणीसाठी मनसेने येत्या मंगळवारी दि29 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय येथे महिलाचा मोर्चा काढण्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी पंढरपूर शहर आणि तालुक्यातील सर्व महिला आणि सामाजिक कार्यकर्ते यानी येथील शिवाजी चौक येथे सकाळी10 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन मनसे चे राज्याचे नेते दिलीप धोत्रे यांनी केले आहे.


  महिलांनी बचत गट कर्ज घेताना आपल्या कर्जातून विमा रक्कम काढून घेतली जात असते. तो विमा हा संकट आल्यावर लागू केला जातो, परंतु विमा रक्कम काढून घेऊन त्याचे सर्टिफिकेट मिळाले नाही त्यामुळे या कोरोनाच्या परिस्थितीत विमा लागू करणे अश्यक्य झाले आहे. व्यवसाय बुडाले साहित्याची नासाडी झाली यामुळे महिलांना आता नव्याने व्यवसाय करणे अवघड झाले आहे. तरी सरकारने यामध्ये योग्य मार्ग काढून अडचणीत आलेल्या महिलांना दिलासा देऊन नवीन कर्ज उपलब्ध करून देन्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणीही या मोर्चात सरकारकडे करण्यात येणार आहे.

     मागील या अनेक वर्षांपासून ही बचत गट वसुली अतिशय काटेकोरपणे केली आहे.सध्या आर्थिक परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे कर्जमाफी एवढाच एक मार्ग शिल्लक असून या मागणीसाठी होणाऱ्या या भव्य मोर्चात विविध राजकिय महिला नेते मंडळी यांनीही आपली उपस्थिती दाखवून महिलांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन दिलीप धोत्रे यांनी केले आहे.

मोठया उद्योगपती ना  जर कर्ज माफ होत असेल तर आपण महिलांनी तर यापूर्वी अनेक वर्षे बिनबोभाट कर्ज भरले आहे. केवळ आता अडचणीत सापडलो आहे त्यामुळे आपण जो विमा भरला आहे तो विमा सर्टिफिकेट द्या त्यापोटी आपण कर्ज माफ करण्यास भागू . जर अडचणीत आणि संकटात जर विमा व्यवसायाला विमा लागू होत नसेल तर मागील वीस वर्षांपासून भरत आलेल्या विमा रक्कम काय कामाची असा सवालही दिलीप धोत्रे यांनी बचतगट कार्यालय। याना विचारला आहे,यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,महेश पवार, कृष्णा मासाळ,सिधेश्वर गरड,निकिता पवार,पूजा लावंगकर,अनविता गायकवाड, प्रताप भोसले, अवधूत गडकरी, आकाश बंदपट्टे, रोहन पंढरपूरकर, नागेश इंगोले,इत्यादी उपस्थित होते,,

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget