65 एकर भक्ती सागर कोविड केअर सेंटर ला जिल्हा परिषद चे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांची भेट



पंढरपूर // प्रतिनिधी 

65 एकर भक्ती सागर कोविड केअर सेंटर ला सोलापूर जिल्हा परिषद चे  अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी गट विकास अधिकारी रविकिरण घोडके,  उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर मुख्यवैधकीय अधिकारी ,डॉ बी के धोत्रे ,नगरअभियंता नेताजी पवार यांचे समवेत पाहणी केली

यावेळी गट विकास अधिकारी रविकिरण घोडके,  उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर यांनी नगराध्यक्षा  सर्व नगरसेवक ,उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली  सध्या  या ठिकाणी 100 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे व भविष्यात अजून 100  बेडची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती दिली तसेच 50 बेड ला ऑक्सीजन ची ही व्यवस्था करण्यात आली आहे परुंतु मेडिकल स्टाफ परिपूर्ण नसल्याने तो मिळाल्यास ऑक्सीजन ची व्यवस्था सुरु करण्यात येईल  आता पर्यंत 247 पॉझिटिव्ह रुग्णानी उपचार घेतले  असून सध्या या ठिकाणी 75 रुग्ण ऍडमिट आहेत 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी 65 एकर येथील  EOC  सेंटर ची ही पाहणी केली काही अडचणी असल्यास त्या नक्की सोडवण्यात येईल असे सांगितले व नगरपरिषद ने  चांगली सुविधा दिल्याचे पाहून समाधान व्यक्त केले

यावेळी त्यांचे सोबत शिवसेना विभाग प्रमुख तानाजी मोहन मोरे राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष दादा थिटे धनगर समाज चे नेते संतोष बंडगर हे उपस्थित होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget