महाराष्ट्रातील पत्रकारांना विमा योजना लागू करा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची महाराष्ट्र शासनाकडे मागणी.



वृत्तसंस्था // प्रतिनिधी  

उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकार राज्यातील पत्रकारांना विमा योजना लागू करीत असेल आणि कोरोनानं मृत्यू झाल्यानं पत्रकारांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देत असेल तर अशी योजना महाराष्ट्र सरकारने का सुरू करू नये ? असा सवाल महाराष्ट्र पत्रकार संघाने केला आहे.

उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील पत्रकारांचा प्रत्येक वर्षी पाच लाख रूपयांचा आरोग्य विमा उतरविण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला आहे.तसेच ज्या पत्रकाराचे कोरोनानं निधन होईल त्यांच्या नातेवाईकांना दहा लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचा महत्वपूर्ण निर्णय देखील योगी सरकारने घेतला आहे.योगी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करून महाराष्ट्र सरकारनं देखील राज्यात अशाच प्रकारची योजना सुरू करावी अशी मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रात पत्रकार विमा योजना सुरू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र पत्रकार  संघ सातत्यानं मागणी करीत आहेत.याच मागणीसाठी आणि कोरोनानं मृत्यूमुखी पडलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रूपयांची नुकसान भरपाई द्यावी यासाठी महाराष्ट्र पत्रकार संघाने 18 सप्टेंबर रोजी राज्यभर आऱोग्य मंत्री राजेश टोपे यांना हजारो एसएमएस पाठवून विमा आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली मात्र सरकारने अजून यासंबंधीचा निर्णय घेतला नसल्याने महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे.’आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा येथील एका कार्यक्रमात बोलताना कोरोनानं मृत्युमुखी पडणार्‍या पत्रकारांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती.मात्र दिलेले शब्द सरकारने अजून तरी पाळलेला नाही,तेव्हा सरकारने पत्रकारांचा आता जास्त अंत न पाहता तातडीन ज्या पत्रकारांचं कोरोनानं निधन झालंय त्यांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रूपयांची नुकसान भरपाई द्यावी’ अशी आग्रही मागणी  करण्यात आली आहे.

31 पत्रकारांचे कोरोनानं बळी

31 जुलै नंतर राज्यात 31 पत्रकारांचे कोरोना किंवा कोरोनासदृश्य आजारानं निधन झालं आहे.आजही राज्यातील पन्नास पेक्षा जास्त पत्रकार राज्याच्या विविध भागातील रूग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहेत मात्र सरकारने पत्रकारांसाठी अद्यापही उपचारासाठी विशेष काहीच योजना आखलेली नाही.पत्रकारांसाठी ऑक्सीजन आणि व्हेटिलेटरची सोय असलेले बेड त्वरित उपलब्ध करून द्यावेत ही मागणी देखील सरकारनं अजून पूर्ण केली नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.तेव्हा सरकारने तातडीने विमा योजना लागू करावी ,50 लाखाची नुकसान भरपाई द्यावी, आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी  मागणी करण्यात येत आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget