आमदार प्रणिती शिंदे यांची सोलापूर शहरातील विविध समस्यांबाबत सोमपा आयुक्त यांच्याकडे बैठक




सोलापुर // प्रतिनिधी 

आमदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवार, दि. 29 सप्टेंबर 2020 रोजी सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे संबंधित शिष्टमंडळासमवेत सोलापूर शहरातील विविध अडचणींकरीता बैठक आयोजित केली होती. 


यामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी 

1) सोलापूर शहरास 2 दिवसाआड पाणी पुरवठा होण्याबाबत. 


2) अक्कलकोट रोड, एम.आय.डी.सी. :- A) एम.आय.डी.सी. अक्कलकोट रोड येथील मनपाच्या नवीन टाकीजवळ अग्निशामक केंद्राची उभारणी करण्याबाबत. B) रस्ते :- अंतर्गत रस्त्यांची दुरुरस्ती C) मुबलक पाणी पुरवठा करण्याबाबत. D) ड्रेनेज साफ-सफाई व दुरुस्ती, E) स्ट्रीट लाईटची सोय करणे. F) कचरा कंटेनर बसविणे. G) सांडपाणी प्रक्रिया केंद्र (CETP) बाबत. 


3) टि.पी.1 फा.प्लॉ. 28अ पौकी सिटी सव्र्हे नं. 10427 येथील श्री मार्कंडेय यंत्रमाग व लघुउद्योग सहकारी संस्थेच्या सुधारित भूमी अभिन्यासास मंजूरी मिळण्याबाबत. 


4) रमाई आवास योजनेतील विविध अडचणींबाबत. 


5) सोमपा सफाई कामगार :- A) सफाई कामगारांचे दोन वसाहत एकाच ठिकाणी रो-हाऊस पध्दतीने बांधून देण्याबाबत. B) लाडपागे कमिटी शिफारशी अंतर्गत सफाई कामगारांचे प्रलंबित समस्यांबाबत सोलापूर महानगरपालिका आयुक्त शिवशंकर साहेब यांच्याकडे  तात्काळ बैठक आयोजित केली. 


याबाबत मा. आयुक्त यांनी सदर विषयासंदर्भात सविस्तर माहिती घेवून अधिकारयाना योग्य ते निर्देश देवून कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश दिले. यावेळी काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक बाबा मिस्त्री, अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर, नगर रचनाकार लक्ष्मण चलवादी, सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी, अक्कलकोट रोड, एम.आय.डी.सी.चे अधिकारी श्री राठोड, यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष श्री. पेंटप्पा गड्डम, श्री. निलेश फोफलिया, श्री. श्रीधर बोल्ली, श्री. मल्लिकार्जुन कमटम, श्री. मार्कंडेय मिक्स झोनचे माजी महापौर श्री. पुरणचंद पुंजाल, श्री. राचर्ला, श्री. राहूल गंजी, रमाई आवास योजनेचे श्री. नागनाथ कासलोलकर, श्री. बंगाळे, श्री.शाम सावगे, सोमपा सफाई कामगाराचे श्री. सायमन गट्टू, श्रीनिवास रामगल आदि, उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget