(या मोर्चामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती)
पंढरपूर // प्रतिनिधी
आज पंढरपूर शहरामध्ये निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चामध्ये हजारो बचत गटाच्या महिलांनी सहभाग नोंदवून सरकारला कर्जमाफीसाठी निवेदन दिले आहे.
सर्व महिला बचत गटांचे संपूर्ण कर्ज माफ व्हावे यासाठी आज पंढरपूर तहसील कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य असा महिला मोर्चा काढण्यात आला होता यावेळी हजारोच्या संख्येने महिलांनी आपली उपस्थिती दर्शवित आपली नाराजी यावेळी व्यक्त केली या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप बापु धोत्रे यांनी केले.
हा मोर्चा पंढरपुरातील शिवाजी चौकातून सकाळी ठीक दहा वाजता निघाल्यानंतर अतिशय मोठ्या संख्येने महिलांनी यावेळी आपली उपस्थिती यामध्ये दर्शवली त्यानंतर ठीक साडेअकराच्या दरम्यान हा मोर्चा पंढरपूर येथील तहसील कचेरीवर जाऊन धडकला त्यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता त्यानंतर सर्व महिला बचत गटाचे कर्ज माफ व्हावे यासाठी मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप बापु धोत्रे यांनी तहसील कार्यालयात निवेदन सादर केले यावेळी सर्व सोलापूर जिल्ह्यातील मनसैनिक मोठ्या संख्येने यावेळी वेळी उपस्थित होते हा मोर्चा इतका विराट होता की पोलीस प्रशासनाला पंढरपूर शहरातील वाहतूक व्यवस्था बाह्यवळण मार्गाने वळवण्यात भाग पडले या मोर्चाचे नेतृत्व दिलीप बापू धोत्रे यांनी केले होते ते यावेळी.
तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे,सिद्धेश्वर गरड, सौ निकिता पवार,सौ रंजना इंगोले,सौ पूजास लावंगकर,महेश पवार ,सागर घोडके,प्रताप भोसले, प्रथमेश पवार,अनविता गायकवाड, प्रशांत इंगळे,जैनुद्दीन शेख, अमर कुलकर्णी, अमोल झाडगे, अप्पा करचे, सतीश दिडवाघ,अनिल केदार, बालाजी वाघ, दिलिप पाचंगे, दीपाली थोरात,नागेश इंगोले इत्यादी उपस्थित होते.
सर्व मोठमोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ होते मग आमच्या गोरगरीब महिला माता भगिनींचे कर्ज का माफ होत नाही ज्या मायक्रो फायनान्स कंपनीनी ज्या महिला बचत गटांचे विम्याचे पैसे घेतले आहेत ते पैसे माघारी घेतल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही ही असे यावेळी दिलीप (बापू) धोत्रे यांनी सांगितले


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.