सोलापूर // प्रतिनिधी
सोलापुरातील सम्राट चौक परिसरातील एका जुगार अड्ड्यावर शहर गुन्हे शाखेने छापा टाकून बारा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून रोख रक्कम 70000 तसेच पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .याबाबत 12 जणांवर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सावकारी, मटक्यावरील पोलिसांच्या कारवाईनंतर जुगारावर मोठी धाड टाकण्यात आल्याने अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अश्विन शिंदे हा सम्राट चौक येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार फौजदार संदीप शिंदे व त्यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी बारा जण जुगार खेळत बसलेले होते. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील 71 हजार रुपयांची रोकड. सहा मोटारसायकली असा चार लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वरील सर्वजण गोलाकार बसून पत्त्यांच्या पानांवर पैज लावून अंदर- बाहर, मन्ना नामक जुगार खेळत होते . निदर्शनास आल्याने त्यांना ताब्यात घेतले असून त्यांचे ताब्यातून जुगार मुद्देमाल हस्तगत करून सदर बाबत जोडभावी पोलीस ठाणे येथे रोख रक्कम 70 हजार 950 , 11 मोबाईल, 6 मोटरसायकल ,6 लाख 90 हजार 950 चा मुद्देमाल हस्तगत केला गेलेला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अभय डोंगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शिंदे, दिलीप नागटिळक, अजय पाडवी, जयसिंग भोई, सागर गुंड ,अश्रूभान दुधाळ ,गणेश शिंदे, चालक काकडे यांनी पार पाडली आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.