खाजगी म्हणजे कोण? विजय शुगर का ?आणि तुम्ही स्वतः म्हणजे सहकारी व सरकारी बाकीचे म्हणजे खाजगी: – उत्तमराव जानकर




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

खाजगी म्हणजे कोण? विजय शुगर का ? आणि तुम्ही स्वतः म्हणजे सहकारी व सरकारी बाकीचे म्हणजे खाजगी माळशिरस तालुक्यातील जनतेला , सभासदांना फसवण्याचे धंदे बंद करा नाही तर एक दिवस फसवा फसवीत व कारखानदारी अपहार यामुळे तुम्ही जेलमध्ये  अडकुन आनेक वर्ष आत राहु नये हीच आमची तळमळ आहे असे  सवाल माळशिरस तालुक्यातील सहकारामधील सत्ताधारी मोहीते पाटील यांचे नाव घेता उत्तमराव जानकर यांनी टिका केली

नुकतेच शंकर सहकारी साखर कारखाना हा माळशिरस तालुक्यातील विरोधक तक्रारी करुन हा कारखाना खाजगी लोकांच्या घशात घालण्यासाठी तक्रारी करत असल्याचा आरोप संचालक मंडळाने केला होता त्याला उत्तर देण्यासाठी वेळापुर गरुडबंगला येथे अयोजीत केलेल्या पञकार परिषदेत उत्तमराव जानकर बोलत होते

पञकार परिषदेला हिंदुराव माने पाटील, प.स. सदस्य रणजितसिंह जाधव, भानुदास सालगुडे, प.स. सदस्य अजय सकट,विलास आदरट, प्रभाकर इंगळे देशमुख, मदनसिंह माने देशमुख, आदि  उपस्थित होते उत्तमराव जानकर पुढे म्हणाले की तुम्ही ४०० पेक्षा जास्त अपहार व भ्रष्टाचाराचे गुन्हे करून पुन्हा या कारखान्यांमधूनच शेतकऱ्यांचे तारणहार आम्हीच आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे गेल्या दोन वर्षांपासून आजही शंकर कारखाना विरोधकांच्या ताब्यात आहे का ? दोन वर्षांमध्ये तुम्ही शेतकऱ्यांची देणी व कामगारांची पगार तसेच ऊस तोडणी वाहतूक कमिशन देण्यासाठी तसेच कारखाना सुरू करण्यासाठी तुम्ही काय केले असा सवाल उत्तमराव जानकर यांनी करत शंकर सहकारी कारखाना सुरु करण्यासाठी तुमच्याकडे असणारा प्लॅन येत्या आठ दिवसांत तालुक्यातील जनतेसमोर ठेवावा असे आवाहन करुन ते पुढे म्हणाले की तुम्ही कारखाना चालविणारे होता तर शंकररत्न, विजय शुगर हे तर हे कारखाने का विकले, की त्याच अनुभवावरती हे कारखाने सुरू करणार आहात का ? हे माळशिरस तालुक्यातील जनतेला जाहीर सभा घेऊन स्पष्ट करावे असे सांगुन जानकर म्हणुन पुढे म्हणाले की विरोधक तक्रारी करतात ही तुमच्या साठी सुधारण्याची संधी समजा आणि तुम्हाला वाटत असले तरी आजही आम्ही संस्थेचे हितचिंतकच आहोत असे सांगुन ते पुढे म्हणाले की सहकार महर्षी साखर कारखान्याची मागील १०वर्षापासुन हा कारखाना सतत तोट्यात आहे आजची स्थिती तुम्हाला वाटत असली तरीही जवळ जवळ बऱ्याच सभासदांना माहिती आहे तुम्ही सदर कारखान्याची थकहमी शंकरराव मोहिते पाटील ट्रस्टने घेतलेल्या कर्जांला देऊन या कारखान्याला अगोदरच अडचणी असलेल्या साखर कारखान्याची काय अवस्था होणार आहे हे न सांगितलेले बरे, मागच्याच आठवड्या मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने सहकार महर्षीची सर्व साखर ताब्यात घेण्याचे पत्र दिले आहे तसेच विजय शुगर व शंकररत्न शुगरला पाच वर्षापूर्वी दिलेल्या उसाच्या रकमेची ४ कोटी ७७ लाख साधी मागणी सुद्धा केली नाही, गेल्या ६० वर्षांपासून साखर कारखानदारी चालविण्याचा कोणता अनुभव तुमच्या कडे आहे हे एकदा सभासद ,शेतकरी यांना कळू द्या तरी, कारखान्याची आजची परिस्थिती व वस्तुस्थिती काय आहे हे एकदा तालुक्यातील जनतेला तुम्ही सांगावे अशी अपेक्षा आहे उत्तमराव जानकर पुढे म्हणाले की मागील दहा वर्षांपासून कारखाना सतत तोट्यात सुरू असून ३१ मार्च २०२० अखेर सहकार महर्षी कारखान्याचा संचित तोटा ८० कोटी रुपये आसपास आहे, कारखान्याचा उत्पादन खर्च वाढला असून शेजारच्या कारखान्यापेक्षा सहकार महर्षीचा उत्पादन खर्च १२०० ते १३०० रुपयेने जास्त असून गेल्या वर्षीचा तोटा ३२ कोटी असुन ३१ मार्च २०२० अखेर एकूण ८० कोटी रुपये तोट्यात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची एफ.आर.पी. थकली आहे, कामगारांचे ८ महिन्याचे पगार थकले आहेत, तोडणी वाहतूक चे पैसे मागील सहा महिन्यांपासून दिले नाहीत  हे सर्व पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ३२ कोटी रुपये थकहमी दिल्याने यंदा कारखाना चालणार आहे याच थकहमीमूळे चालू वर्षाचे कर्शिंग लायसन्स मिळणार आहे ६० वर्षे होऊन ही हा कारखाना कर्जातआहे ! ६० वर्षे कारखाना स्थापन होऊन कारखाना कर्जमुक्त का झाला नाही ? असा सवाल केला. पुढे बोलताना उत्तमराव जानकर म्हणाले की शिवामृतने विजय नागरी पतसंस्थामध्ये ४ कोटी ७२ लाख रुपये ठेवले होते नंतर या पतसंस्थेचे विजय मल्टिस्टेट मध्ये परिवर्तन झाल्यावर हे पैसे बुडाले असल्याचा आरोप करुन ते पुढे म्हणालेकी एकूण ७ कोटी ८२ लाख रुपये हा शिवामृतचा अपहार आहे.तर दीड कोटी रुपये पेक्षा जास्त रकमेची ठेव कुठेही आढळून येत नाही असे सांगीतले ते पुढे म्हणाले की जिल्हा बँकेचे प्रशासक कोथमिरे सांगतात की माळशिरस तालुक्यातील विजय शुगर कारखान्याकडे ९२ कोटी रुपये, शंकरराव मोहिते पाटील चॅरिटेबल ट्रस्ट 51 कोटी रुपये, शिवरत्न शिक्षण संस्था 15 कोटी रुपये, सूतगिरणी 3.50 कोटी रुपये हे बिगर शेती कर्ज भरल्याशिवाय माळशिरस तालुक्याला नवीन पीककर्ज मिळणार  नाही तसेच मध्यम आणि दीर्घ मुदत कर्ज मिळत नाही त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍याचे मोठे नुकसान होत असल्याचे शेवटी उत्तमराव जानकर यांनी सांगीतले

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget