अकलूज शहरातील हॉस्पिटलमध्ये स्थानिक रहिवाशांसाठी प्रत्येकी १० बेड शिल्लक ठेवावे.- शेखर खिलारे युवासेना अकलूज शहर प्रमुख



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

सध्या अकलूज सह माळसिरस तालुका परिसरात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे.अकलुज शहरातील कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नाहीत.असे समजते अकलूज शहरातील हॉस्पिटल मध्ये  पुणे सह इतर तालुक्यातुन येऊन लोक ॲडमिट होत आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांनची  उपचारासाठी गैरसोय होत असून गावातील नागरिकांना उपचारासाठी इतरत्र जावे लागत आहे. तरी अशा परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांची व गोरगरीब लोकांची खूप अडचण होते आहे.अकलूज शहरातील स्थानिक रहिवाशांच्या उपचारासाठी शहरातील प्रत्येक हॉस्पिटल मध्ये प्रत्येकी प्राधान्याने १० बेड शिल्लक ठेवावे व फक्त अकलुजसह माळशिरस तालुक्यातील सर्व दवाखान्यात स्थानिक लोकांना ऍडमिट करून उपचार करावेत. अकलूज शहरातील हॉस्पिटलांमध्ये बेड शिल्लक नसल्याच्या कारणाने एखाद्या स्थानिक नागरिकांचा उपचारा वाचून मृत्यू झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल.अशी मागणी मा.आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा प्रांत अधिकारी अकलुज यांना अकलुज शहर युवासेनेच्या वतीने करण्यात आली असून सदरचे निवेदन प्रांत अधिकारी अकलुज तहसिलदार माळसिरस,तालुका वैद्यकीय अधिकारी माळसिरस यांना देण्यात आले असून आमची जनतेच्या जिव्हाळ्याची न्याय मिळवून देणारी आहे तरी दि: १०/९/२०२० पर्यंत पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा. निवेदनाद्वारे अकलुज शहर युवासेनेच्या वतीने शेखरभैय्या खिलारे यांनी दिला आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget