वृत्तसंस्था // प्रतिनिधी
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवसाय व उद्योग धंदे बंद असल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.या पार्श्वभूमीवर या काळातील 300 युनिट पर्यंतची वीज बिल माफ करून वरील शिल्लक युनिट यावर सवलत, देऊन,टप्प्या टप्प्याने पुढील बिला मध्ये मासिक हफ्ते ठरवून बिल आकारणी करून
घ्यावी.
निवेदना मध्ये असे म्हटले आहे की,करोना विषाणूच्या संकटात लॉकडाऊन मुळे सामान्य जनता मेटाकुटीस आली आहे.उद्योग,व्यवसाय बंद राहिल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.या करोनाच्या काळामध्ये त्यांना त्यांच्या लोन चे हप्ते ही भरायचे आहेत अशा परस्थितीमध्ये महावितरण कडून भरमसाठ बिल आकारणी केली गेली ऐकी कडे कुटुंबाचा उदरनिर्वाह चा कसा चालवायचा याचा प्रश्न निर्माण झाला असताना आता वाढीव वीज बिलामुळे नागरिकांच्या डोकेदुःखीत भर पडली आहे, यासाठी आपण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननकाळामधील आलेले वीज बिल माफी करावी,अन्यथा भारतीय राष्ट्रवाद पार्टी कडून तीव्र पद्धतीने आंदोलने केलीं जातील.
निवेदन महावितरण आकुर्डी विभागीय कार्यलय अभियंता श्री चौधरी साहेब यांना देताना महाराष्ट्र राज्य जनसंपर्क प्रमुख अजित संचेती, युवा प्रदेश उपाध्यक्ष संदीप गायकवाड,पुणे जिल्हा अध्यक्ष छाया राय, पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष जगदीश मडाले, पिं. चिं महिला उपाध्यक्ष पूनम मोरे,पिं,चिं युवा शहराध्यक्ष अक्षय घोडके,युवा उपाध्यक्ष गिरीश पाटील,चिंचवड विधानसभा अध्यक्ष निमिष पळशीकर, तुषार जाधव,रोहन पांडे,सुमित गायकवाड व देहु रोडचे सामाजिक कार्यकर्ते सय्यद सर उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.