वृत्तसंस्था // प्रतिनिधी
फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्चने कंपनीच्या कामकाजाच्या ट्रेंडवर आधारीत ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित केला आहे. ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. भाऊसाहेब रुपनर व कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा एफडीपी प्रशिक्षण आणि प्लेसमेंट विभागाचा एक उपक्रम आहे. महाराष्ट्रातील सर्व अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक कॉलेजच्या जास्तीत जास्त प्राध्यापकांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि आपले तांत्रिक ज्ञान समृद्ध करावे अशी अशी माहिती कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमात अभियांत्रिकी कंपनी असेंट टेक्नो सोल्यूशन्स प्रा. लि. आणि प्रशिक्षण कंपनी सुविधा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी प्रा. लि. मुंबईचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री वसंत दिनकर मेस्त्री ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. त्यांना उर्जा क्षेत्रातील, रासायनिक प्रक्रिया संयंत्र, अभियांत्रिकी डिझाईन, खरेदी व बांधकाम यासंबंधीचा 30 वर्षांचा अनुभव आहे. विविध इनहाऊस व कॉर्पोरेट प्रशिक्षण कार्यक्रमातून प्रशिक्षण देण्याच्या अनुभवावर आधारित आज प्राध्यापकांचा विकास होणे आवश्यक आहे, कारण महाविद्यालयीन प्राध्यापक ही एक महत्त्वाची व्यक्ती आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रांचे ज्ञान प्राध्यापकांना प्रत्येक अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये मजबूत शैक्षणिक कौशल्य निर्माण करण्यास, उद्योगाच्या वेगाने वाढणाऱ्या विकासास आणि स्वत: च्या कामाची ओळख शिकण्यास मदत करत असते. ऑईल वेल ड्रिलिंग प्रक्रिया, गॅस डिहायड्रेशन सिस्टम, ऑईल फील्ड लेआऊट आणि इंटरफेस सारख्या विविध अभियांत्रिकी ऑफशोर सिस्टमवरील उत्कृष्ट शिक्षक विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता प्राध्यापकांनी https://docs.google.com/forms/

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.