पंढरपूर // प्रतिनिधी
महाराष्ट्रामध्ये मातंग समाज हा अतिशय गरीब समाज आहे.पंढरपूर तालुक्यातील मौजे गुरसाळे येथे गेल्या २० ते २५ वर्ष झाली.गुरसाळे गावामध्ये मातंग अनेक वर्षापासून राहत आहेत.मौजे गुरसाळे या गावामध्ये मातंग समाज मंदिर ग्रामपंचायतने आज तागायत बांधले नाही.या ग्रामपंचायतील अनेक वेळा मातंग समाजानी मागणी केली होती. पण आजून पर्यंत मातंग समाज मंदिर बांधले नाही.या गुरसाळे ग्रामपंचायतचे दुरदुर्व्य आहे.या समाजाला अनेक गोष्टी पासून वंचित ठेवले जात आहे.
पंढरपूर माढा विधानसभा आमदार बबनराव शिंदे व सोलापूर जिल्हापरिषदचे माजी व समाजकल्याण समितीचे सभापती शिवाजीराव कांबळे यांनी दि.०४\०८\२०१४रोजी प्रस्थाव आणि निधी उपलब्ध करून दिला होतो.पण तो निधी गुरसाळे ग्रामपंचायतने मातंग समाज मंदिरासाठी वापरला नाही. आता चालूमध्ये मातंग समाज मंदिर बांधण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध केला आहे.तो निधी मातंग समाज मंदिरासाठी वापर करावा.आणि मौजे गुरसाळे ग्रामपंचायतीने मातंग समाज मंदिर बांधून समाजला न्याय घ्यावा. तसेच गावातील पिण्याच्या पाण्याची टाकी पुर्णपणे रिकामी ठेवली जात आहे.त्या टाकीची दुरूस्ती करून गुरसाळे गावातील नागरिकांना पाण्याची सोय करावी.त्या पाण्याच्या टाकी शेजारी अनेक वर्षापासून अंगणवाडी शाळा आहे.ती अंगणवाडी शाळा पुन्हा सुरू करावी.या सर्व गोष्टी गटविकास अधिकारी किरण घोडके साहेब यांनी जातीने लक्ष घालून मौजे गुरसाळे ग्रामपंचायतील आदेश काढून मातंग समाज मंदिर व पाण्याची टाकी आणि अंगणवाडी शाळा दुरूस्ती करून घ्यावात.या सर्व मागण्याचा निर्णय योग्य नाही घेतला तर आम्ही शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने गटविकास उपाअधिकारी पंचायत समितीचे पिसे साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे.तरी आपण या निवेदनाची दखल न घेतल्यास आपल्या पंचायत समिती कार्यलयासमोर बेमुदत अमर उपोषण केले जाईल.अशा इशारा देताना शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे,छावाचे जिल्हाध्यक्ष नागेश गायकवाड, बहुजन बिग्रेडचे नानासाहेब खंडागळे, ओ.बी.सी.सेलचे शहराध्यक्ष मधुकर फलटनकर,विशाल शिंदे,करण चवरे,अमरदिप लोखंडे,इत्यादी उपस्थिती होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.