(कृत्रिम तलावात केले दहा हजार गणेशमूर्तीचे विसर्जन)
पंढरपूर // प्रतिनिधी
चंद्रभागेचं प्रदुषण कमी करण्याबरोबरच कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी मनसेेने यंदा गणेश विसर्जनासाठी चंद्रभागा आपल्या दारी हा उपक्रम राबवला. या पर्यावऱणपूरक उपक्रमाला शहरातील गणेश भक्तांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. गणेश चतुर्थीच्या दिवशी जवळपास दहा हजार गणेशमूर्तींचे मनसेने तयार केलेल्या चंद्रभागा पाण्याच्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. मनसेच्या प्रदुषण मुक्त आणि पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रमाचे राज्यभरातील पर्यावरण प्रेमींनी कौतुक केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेश उत्सव सर्वत्र साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. दहा दिवसाच्या गणेश उत्सवामध्ये नागरिकांनी देखील प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शांततेत आणि तितक्याच भक्तीमय वातावरणात गणेश उत्सव साजरा करुन आदर्श गणेशभक्तीचे दर्शन घडवले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी चंद्रभागा आपल्या दारी या उपक्रमातून शहरातील गणेश भक्तांना गणेश मूर्ती विसर्जन करण्याची सोय उपलब्ध करुन दिली होती. 30 विसर्जन रथ तयार केले होते. या रथामध्येच चंद्रभागेच्या पाण्याचे कृत्रिम तलाव तयार केले होते.
दिवसभर सुमारे दहा हजाराहून अधिक घरगुती गणेशमूर्तीचे या रथामध्ये विसर्जन करण्यात आले.
त्यानंतर निर्माल्य आणि गणेशमूर्तीचे विधीवत मोठ्या शेततळ्यातील पाण्यात विसर्जन कऱण्यात आले. मनसेच्या पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रमामुळे येथील चंद्रभागानदीचे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण कमी कऱण्यास मदत झाली आहे. दरवर्षी शहरातील सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन चंद्रभागानदी पात्रात केले जाते.रासायनिक रंग आणि प्लाॅस्टर आॅफ पॅरिसरच्या गणेश मूर्तीमुळे चंद्रभागेचे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होते. यंदा मात्र मनसेच्या चंद्रभागा आली आपल्यादारी या उपक्रमामुळे चंद्रभागेचे प्रदुषण रोखण्यास मदत झाली आहे. प्रर्यावरण प्रेमींकडून देखील मनसेच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड, प्रताप भोसले,महेश पवार, इत्यादी उपस्थित होते
दरवर्षी चंद्रभागेच्या पाण्यात गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. यामुळे नदीचे प्रदुषण होते. त्यातून लोकांच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होते. नदीपात्रात अस्वच्छता निर्माण होेते. नदीचे प्रदुषण कमी व्हावे आणि कोरोनाचा संसर्ग देखील कमी व्हावा .यासाठी मनसेनेच्या वतीने चंद्रभागा आपल्या दारी हा उपक्रम राबवला. यामध्ये दहा हजाराहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन कऱण्यात आले. पर्यावरण पूरक आणि प्रदुषणमुक्त गणेश उत्सव साजरा व्हावा हिच आमची भूमिका होती. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला,या
गणेशमूर्ती तयार करण्यासाठी काॅपर, चुना व विविध रासयनिक रंगाचा वापर केला जातो. गणेश मूर्ती नदीपात्रात विसर्जन केल्यामुळे नदीचे जवळपास दरवर्षी 70 ते 80 टक्के प्रदुषण होते.यावर्षी पंढरपूर येथील मनसे आणि नगरपालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करुन त्यामूर्ती विसर्जन केले. त्यामुळे चंद्रभागेचे प्रदुषण कमी होण्यास मदत झाली आहे. दरवर्षी असे उपक्रम राबवले तर नदी प्रदूषणमुक्त होईल,(अरविंद कुंभार, पर्यावरण प्रेमी,सोलापूर)

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.