वृत्तसंस्था // प्रतिनिधी
तालुक्यातील भंडारकवठे येथील भीमा नदीच्या पात्रात बंधार्यावरुन पडून आणखी एकजण वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की शंकर कल्लप्पा कोले.(वय-६५) रा.कंदलगाव हे नंदूर (मंगळवेढा)वरुन आपल्या मोटारसायकलवर गावाकडे निघाले होते .भंडारकवठे येथील भीमा नदीच्या पात्रावरील बंधार्यावरुन जाताना मोटारसायकल वरचा ताबा सुटल्याने ते नदीत पडून वाहून गेले. पाण्याच्या प्रचंड प्रवाहात शंकर कोले पडल्याने बेपत्ता आहेत. या आठवड्यात सादेपूर, भंडारकवठे बंधार्याजवळ वाहून जाण्याची ही तिसरी घटना आहे .यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे .सध्या सादेपूर आणि भंडारकवठे बंधार्याजवळ कोणतीच आपत्तकालीन व्यवस्था तैनात नाही यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे ,

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.