वृत्तसंस्था // प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत स्थगिती दिल्याने राज्य सरकारने या बाबतचा त्वरित आदेश काढावा अन्यथा त्याचा समाजात उद्रेक होईल असा इशारा सकल मराठा समाजाचे नेते अॅड. धनंजय हजारे यांनी एक प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
अॅड. हजारे म्हणाले, न्यायालयाने दिलेला निकाल एक कोटीचे मत असू शकते. ते दिलेल्या वकिलांचे अपयश असू शकत नाही. प्रत्येक वकील प्रयत्न करतात. परंतु ते कोर्टाचे निकाल बदलू शकत नाही त्यामुळे आता सदर प्रकरण हे एका पेक्षा जास्त न्यायाधीश असलेल्या न्यायालयाकडे वर्ग करण्यात आल्याने बहुमताने पुढील निकाल लागू शकतो. तोपर्यंत राज्य सरकारने अध्यादेश काढणे गरजेचे आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.