मी 24 रुपये 50 पैसे या दराने दुधाला दर:- अध्यक्ष दिलीप माने
सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी नव्याने नियुक्ती झाल्यानंतर सुरुवातीलाच माजी आमदार दिलीप रावजी माने यांनी सर्व गोरगरीब व कष्टकरी शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना एक आनंदाची बातमी दिली असून त्यांनी सोलापूर जिल्हा दूध संघाच्या वतीने इथून पुढे येणाऱ्या दुधाला 24 रुपये 50 पैसे आम्ही भाव देणार असल्याचे जाहीर केले आहे आहे त्यामुळे सर्व सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे नुकतीच सोलापूर जिल्हा दूध संघाची बैठक संपन्न झाली यामध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष माजी आमदार दिलीप रावजी माने यांनी सोलापूर जिल्हा दूध संघाचा संपूर्ण आढावा घेतला यावेळी त्यांनी सर्व शेतकरी दूध उत्पादकसभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून दूध उत्पादक शेतकरी जगला पाहिजे व टिकला पाहिजे या उदात्त हेतूने आज जिल्हा दूध संघाच्या बैठकीमध्ये वरील हा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. यावेळी सोलापूर जिल्हा दूध संघाचे नूतन अध्यक्ष माजी आमदार दिलीप रावजी माने यांनी सांगितले की सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही केंद्रबिंदू मानून हा निर्णय घेतला असून सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाची वाटचाल व कारभार हा परत एकदा काटकसरीने करून जिल्हा दूध संघ महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1 ला नेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर गोरगरीब दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दुधाला भाव मिळावा ही आमची स्पष्ट भूमिका यामागे आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.