सरकारी घुशीने खाल्ला मुरूम?पाटबंधारे अधिकाऱ्यास तातडीने निलंबित करा ÷शिवस्वराज्य युवा संघटना आक्रमक मागणी



पंढरपूर // प्रतिनिधी 

मंगळवेढा शासनाचा महसूल बुडवून हाय वे ठेकेदाराला सरकारी जमिनीतला मुरूम विनापरवाना दिला असून या तसेच अन्य सर्व प्रकारची चौकशी करून उपविभागीय अधिकारी शिवाजी चव्हाण याना निलंबित करण्यात यावे आहि मागणी शिवस्वराज्य युवा संघटनेने केली आहे.सद्या शासनाची तिजोरी  अडचणीत असताना मिळेल त्या मार्गाने शासनाला महसूल मिळण्याची गरज आहे पण या महसुलालाच सरकारी घुशी चिकटल्या असल्याचा प्रत्यय वारंवार येत असतो.गेल्या महिन्यापासून मंगळवेढा येथील सरकारी मुरूम चोरीचा असाच प्रकार गाजत आहे.भीमा पाटबंधारे विभाग पंढरपूर यांच्या अधिपत्याखाली असलेले उजनी कालवा उपविभाग क्रमांक ५२ हे कार्यालय मंगळवेढा येथे कार्यरत आहे. या कार्यालयाच्या एकेक लिला वाजत गाजत असतानाच मुरूम प्रकरण आज चांगलेच पेटू लागल्याचे दिसत आहे. 

  उजनी कार्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या सरकारी जमिनीवरील अगणित मुरूम ठेकेदाराने उचलून नेला आहे परंतु उपविभागीय अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी हा चोरीचा प्रकार रोखला नाही. सदर तक्रारी या भागातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्याही कानावर घातला पण दिवसाढवळ्या संगनमताने होणारी चोरी थांबली नाही की रॉयल्टीही सरकारजमा झाली नाही.यात मोठा आर्थिक घोटाळा करण्यात आल्याची चर्चा आता उघडपणे होताना दिसत असून वरिष्ठ पातळीवरूनही अद्याप ठोस काही कारवाई झालेली समोर आली नाही.शिवस्वराज्य युवा संघटना मात्र या प्रकरणी भलतीच आक्रमक झाली असून उजनी कालव उपविभाग ५२,मंगळवेढा या कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी शिवाजी चव्हाण यांच्या निलंबनाची मागणी संस्थापक अध्यक्ष संदीप मुटकुळे यांनी केली आहे.मुटकुळे यांनी लेखी निवेदनाद्वारे महसूल मंत्री, जलसंपदा मंत्री यांच्यासह सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.या अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही 'शिवस्वराज्यचे अध्यक्ष संदीप मुटकुळे यांनी दिला आहे.मुरूम प्रकरणा व्यतिरिक्तही अन्य बाबींची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

आणखीही फसवणूक सदर

उपविभागीय अधिकारी चव्हाण हे मुख्यालयात न राहता शासनाचे दरमहा घरभाडे घेऊन सरकारचीही फसवणूक करीत आहेतअशीत क्रारही शिवस्वराज्यचे अध्यक्ष संदीप मुटकुळे यांनी शासन आणि प्रशासनयांच्याकडे

आहे.सदर अधिकारी हे केली  शेतकऱ्यांचे शत्रू असून मुख्यालयात रहात नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. या अधिकाऱ्याच्या अन्य काही वर्तनामुळे शासनाची बदनामी होत आहे. असे मुटकुळे यांनी आपल्या तक्रारी म्हटले असून अन्य प्रकरणाची स्वतंत्र निवेदनाद्वारे ते चौकशीची मागणी करणार आहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget