दुधनी नगरपालिकेत लोकशाहीचा शासन की हुकुमशाहीचा?



सोलापूर // प्रतिनिधी 

देशात पाच, सहा महिने झाले कोरोनाने थैमान घातले आहे आणि केंद्र सरकार कडून 3 महिने कडक लाॅकडाऊन करण्यात आला, त्या लाॅकडाऊन मुळे कित्येक लोक उपाशी मारले गेले, बेरोजगारी वाढली, कोरोना संसर्गामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले , काही लोकांना अन्न, औषध, दवाखानेचा उपचार असे अनेक समस्यांना बळी पडले व शेवटी मृत्यू शी शरणागती झाले. कोरोना च्या काळात शासनाने अनेक नविन कायदा व नियम काढले ते ही नागरिकांनी सोसले, विनाकारण पोलिसांच्या लाठीचा मसाज काही लोकांना करून घ्यावी लागली पण लोकांनी कधी शासनाच्या विरोध केले नाही, लोकांनी तीन महिने फक्त भात खाल्ले तर काही पाणी पिऊन जगले तर काही लोकं पंचपक्वान्न!

आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुधनी गावात नगरपालिकेच्या वतीने दवंडी पिटवण्यात आला की सर्व दुकानदार, भाजी व फळ विक्रेते, दोन दिवसात कोरोना स्वॅब टेस्ट करून घ्यावे अन्यथा तुमचे 15 दिवस दुकान सील  करण्यात येईल. हे ऐकताच दुधनी नागरिकांना असे घाम सुटला कि कोरोना होऊ द्या पण दुकान बंद ठेवता कामा नये म्हणून काही नागरिकांनी स्वॅब करुन घेतले तर काही नागरिकांनी असे त्यांनी व्यक्त केले की आम्हाला कुठला ही रोग झाला तर आम्ही स्वतःहून डाॅक्टर कडे जातो पण डाॅक्टर कधी पेशंटला जबरदस्ती केली नाही की मी तुला बळजबरीने उपचार करतो म्हणून, आता लोकांना हा प्रश्न पडला आहे की दुधनी नगरपालिकेत लोकशाही चा शासन चालत आहे की हुकुमशाहीचा?

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget