एअरटेल नेटवर्कचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा

 


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

कोरोना साथीच्या महामारीमुळे राज्यात शाळा  सुरू झाल्या नाहीत.परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण देण्याची सुविधा सुरू झाली. परंतु जुन्नर तालुक्यातील पूर्व पट्टयातील बोरी गावातील परिसरात एअरटेल कंपनीचे नेटवर्क मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या आॕनलाईन शिक्षणात अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे .


संपूर्ण देशात कोरोना व्हायरस या महामारीने थैमान घातल्याने राज्यात कोरोना साथ वाढत असल्याच्या धास्तीने राज्यात शाळा उघडण्यास परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरीच  मोबाईलवर आॕनलाईन शिक्षण देण्याचे शासनाने सुचवले आहे.परंतु जुन्नर तालुक्यातील बोरी परिसरातील साळवाडी     शिरोली,सुलतानपूर, जाधववाडी,भोरवाडी आदी गावातील भागात एअरटेल कंपनीचे ग्राहक जास्त प्रमाणात आहे.यापूर्वी एअरटेल कंपनीचे नेटवर्क चांगल्या प्रकारे कार्यरत होते. परंतु काही दिवसांपासून या  कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित मिळत नाही.नेटवर्क मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना आॕनलाईन शिक्षणात अडथळा तर येत असल्याने शिक्षण घ्यावे कसे? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा आहे. याशिवाय ग्राहकांचे  मोबाईल फोन लागत नाही. किंवा डायल केलेला नंबर अस्तित्वात नाही, किंवा डायल केलेला नंबर  संपर्क क्षेत्राच्या बाहेर  आहे असे सांगितले जाते. किंवा फोन लागला तर मध्येच कट होणे, असे प्रकार घडत आहे. नेटवर्क असले  तरी इंटरनेटला स्पीड मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना  ऑनलाइन शिक्षण घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत.अनेक ग्राहकांनी कंपनी कस्टमर केअरला फोन केला असता फोन उचलला जात नाही. किंवा चुकून उचलला तर आम्ही लवकरच आपली समस्या दूर करण्याचा प्रयत्न करू.असे उत्तर देऊन पुन्हा परिस्थिती जैसे थे! त्यामुळे एअरटेल कंपनीच्या नेटवर्कमध्ये सुधारणा न झाल्याने दुसऱ्या चांगल्या नेटवर्क कंपनीकडे ग्राहक वळू लागले आहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget