सोलापूर // प्रतिनिधी
पत्रकारांसाठी कोरोनाच्या अनुशंगाने हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन बेड तसेच व्हेंटीलेटर बेड राखीव करणे बाबत मा. मुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री यांना महाराष्ट्र पत्रकार संघ मागणी करणार.उद्या दि.5 सप्टेंबर 2020 रोजी एकाचवेळी ही मागणी करण्यात येणार आहे.
कोरोना बाधित पत्रकारांसाठी राज्यात शासकीय आणि धर्मदाय आयुक्तांच्या अखत्यारित असलेल्या खासगी रुग्णालयात राखीव बेडची व्यवस्था प्राधान्याने करणेबाबत महाराष्ट्र पत्रकार संघाची आग्रही मागणी
पुण्यातील टीव्ही 9 चे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांना कोरोनावर वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.श्री रायकर यांच्यासारख्या तरुण व होतकरू, निर्भिडपणे लेखन करणाऱ्या रायकर यांच्या मृत्यूची गंभीर दखल महाराष्ट्र पत्रकार संघाने घेतली आहे. त्यासंर्भात मा. मुख्यमंत्री, मा. आरोग्यमंत्री व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने निवेदने पाठवायचा निर्णय घेण्यात आला आहे. आज रोजी राज्यात शेकडो पत्रकारांना कोरोनाची बाधा झालेली आहे. त्यातील बहुतेकजण बरे होऊन घरी गेले असले तरी किमान 11 पत्रकार कोरोना विरोधातली लढाई हरले आहेत. आजही किमान 50 पत्रकार विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. मात्र पत्रकारांना व्यवस्थित उपचार मिळत नसल्याच्या सातत्यानं तक़ारी येत आहेत. पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचंही योग्य उपचार न मिळाल्यानं निधन झाल्यांची दुर्दैवी घटना पुण्यात घडली. त्यांना वेळेत अॅम्ब्युलन्सची व्यवस्था तसेच ऑक्सिजनही न मिळाल्यामुळे एका तरूण आणि उमद्या पत्रकाराचं निधन झाले, ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही पत्रकारावर अशी वेळ येऊ नये, म्हणून पत्रकारांसाठी राखीव खाटा ठेवाव्यात, अशी महाराष्ट्र पत्रकार संघाची आग्रही मागणी आहे. कृपया या मागणीचा तातडीने विचार व्हावा. पांडुरंग रायकर हे केवळ अव्यवस्थेचे बळी ठरले आहेत, संघाची मागणी आहे की, त्यांच्या कुटुंबियांना योग्य ती आर्थिक नुकसान भरपाई दिली जावी. आणि कोरोना काळात कोरोना यौध्दे असलेल्या पत्रकारांना आपले काम अधिक निर्धाराने करता येईल, अशी व्यवस्था व्हावी, अशी आग्रही विनंती संघाच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.